शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये पुन्हा ३० नक्षल्यांचा खात्मा, राखीव दलाच्या एका जवानाला हौतात्म्य; बस्तर भागातील दोन जिल्ह्यांत चकमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 06:41 IST

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...

गडचिरोली : छत्तीसगडमधील बस्तर भागात बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांनी राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान दोन वेगवेगळ्या चकमकी उडाल्या. यात ३० नक्षलवादी ठार झाले, तर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला.  बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमाभागातील गंगलूर जंगल परिसरात पाेलिसांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली. यावरून गुरुवारी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षलींविरोधात अभियान राबविले. याचवेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गाेळीबारात २६ नक्षलवादी ठार झाले. यात बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला.कांकेर-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमाभागात दुसरी चकमक झाली. यात चार नक्षलवाद्यांना सुरक्षा जवानांनी ठार केले. दोन्ही घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. 

या वर्षी आतापर्यंत ११३ नक्षलवादी ठार बस्तर जिल्ह्यातल्या गुरुवारच्या कारवाईसह, या वर्षी राज्यात आतापर्यंत झालेल्या चकमकीत ११३ नक्षलवादी मारले गेले आहेत. ९७ जणांचा खात्मा बस्तर विभागात करण्यात आला आहे. यात बिजापूर व कांकेरसह सात जिल्ह्यांतील कारवायांचा समावेश आहे. ९ फेब्रुवारीला बिजापूरमधील जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षल्यांना ठार केले होते. यावर्षी आतापर्यंत १८ नक्षलवाद्यांना अटक केली हाेती.

पुढील वर्षीपर्यंत देश नक्षलमुक्त : शाह देशाला नक्षलमुक्त करण्याच्या मोहिमेत सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. मोदी सरकारने नक्षलवाद्यांबद्दल कठोर भूमिका घेतली आहे. जे नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाहीत त्यांच्याविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे पुढील वर्षी ३१ मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.   

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीSoldierसैनिकPoliceपोलिसMartyrशहीद