शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

२४२ बांगलादेशी घुसखोरांना अटक

By admin | Updated: April 23, 2015 06:07 IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी बांगलादेशींची घुसखोरी वाढली असून जानेवारी २०१५ पर्यंत मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारतात ठाण मांडणाऱ्या २४२ बांगलादेशी

डिप्पी वांकाणी, मुंबईगेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी बांगलादेशींची घुसखोरी वाढली असून जानेवारी २०१५ पर्यंत मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारतात ठाण मांडणाऱ्या २४२ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. मागच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकांमुळे सीमावर्ती भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात येऊनही बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केलीच. २०१४ मध्ये एकट्या मुंबईत ४१८ बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. यापैकी २८६ जणांना माघारी पाठविण्यात आले होते.सार्वत्रिक निवडणुकांमुळे सीमावर्ती भागात कडेकोट नाकाबंदी करण्यात आल्याने फारशी घुसखोरी झाली नाही; परंतु यावर्षी बांगलादेशींचे घुसखोरींचे प्रमाण वाढल्याचे दिसते. मीरा रोड, ठाणे, मुंब्रा आदी भागांत ठाण मांडून हे बांगलादेशी मिळेल ते काम करतात, असे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.बांगलादेशी नागरिकांना भारतात मुक्तप्रवेश देण्यात सीमा सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. एक ते दोन हजार रुपयांच्या मोबदल्यात बांगलादेशी नागरिकांना खुशाल भारतीय हद्दीत प्रवेश दिला जातो. भारताच्या विविध भागांत हे नागरिक काम करून भरपूर पैसा कमावतात. पुरेशी कमाई झाल्यानंतर ते या पैशातून गावी घर बांधण्यासाठीआपापल्या गावी परतात, असे या अधिकाऱ्याने सांगितले.बांगलादेशी भारतीयांसारखेच दिसत असल्याने त्यांना हुडकणे कठीण आहे. एवढेच नाही तर यापैकी काही महाभाग अधिकाऱ्यांना लाच देऊन प. बंगालमधील मतदार ओळखपत्रही मिळवितात. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण असते. दहशतवादी संघटना कारवाया करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. अलीकडेच मुंबईतील ९६ पोलीस ठाण्यांत दहशतवादविरोधी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बांगलादेशींंचा माग कसा काढायचा, याचे आठवडाभराचे प्रशिक्षण देण्यात येते. झोपडपट्टी भागात जाऊन तेथील लोकांकडून बांगलादेशींची माहिती घेण्याचेही कसब पोलिसांना शिकविले जाते.