शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

१८ भूखंड १२ वर्षांपासून बिल्डराच्या ताब्यात

By admin | Updated: June 17, 2014 03:25 IST

महापालिकेने १८ आरक्षित भूखंड विकसित करण्याला परवानगी दिली असून बिल्डरांनी वर्षानुवर्ष विकसित भूखंडापैकी २५ टक्के मालमत्ता पालिकेला हस्तांतर केली नाही

सदानंद नाईक, उल्हासनगरमहापालिकेने १८ आरक्षित भूखंड विकसित करण्याला परवानगी दिली असून बिल्डरांनी वर्षानुवर्ष विकसित भूखंडापैकी २५ टक्के मालमत्ता पालिकेला हस्तांतर केली नाही. यामुळे या मालमत्तांवर मालकी पालिकेची की, ते गिळंकृत करणाऱ्या विकासकांची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हासनगर पालिकेने आरक्षित भूखंड विकसित करण्याला १० ते १२ वर्षांपूर्वी बिल्डरांना बांधकाम परवानगी दिली आहे. तसेच विकसित भूखंडापैकी २५ टक्के मालमत्ता पालिकेला हस्तांतरित करण्याची अट बांधकाम परवानगी देतेवेळी घातली होती. १८ आरक्षित भूखंडापैकी अनेक जणांनी भूखंड विकसित केले आहेत. मात्र विकसित भूखंडांपैकी २५ टक्के विकसित मालमत्ता पालिकेला हस्तांतरित केली नसल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात पालिका महासभेत सेनेचे धनंजय बोडारे यांनी विषय मांडला, मात्र कारवाई करतो, या पालिका आयुक्तांच्या आश्वासनापलीकडे कारवाई झाली नसल्याची टीका बोडारे यांनी केली. महापालिका शिक्षण मंडळ व राज्य शासनाचे शिधावाटप कार्यालय बिल्डरांनी विकसित केलेल्या २५ टक्के विकसित जागेवर कार्यरत आहे. बिल्डरांनी वाढीव चटई क्षेत्राचा लाभ घेत, याच इमारतीवर पुन्हा दोन मजले जादा बांधकाम केले आहे. मात्र बिल्डरांनी अद्याप विकसित जागेपैकी २५ टक्के जागा पालिकेला हस्तांतरित केली नाही, तसेच पालिकेने बिल्डरांवर काहीएक कारवाई केली नाही.महापालिकेच्या या मालमत्तांचा वापर बांधकाम व्यावसायिक वर्षानुवर्ष करीत असूनही पालिका व लोकप्रतिनिधी त्याविरोधात काहीएक कारवाई करीत नाही. पालिका बिल्डरधार्जिणी असल्यानेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे, बंडू देशमुख यांनी केला आहे.