आणखी 18 गणपती ‘विशेष’

By Admin | Updated: August 21, 2014 01:58 IST2014-08-21T01:58:45+5:302014-08-21T01:58:45+5:30

गणोशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून आणखी 18 विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. एलटीटी ते रत्नागिरीर्पयत ही विशेष गाडी धावेल.

18 more Ganpati 'special' | आणखी 18 गणपती ‘विशेष’

आणखी 18 गणपती ‘विशेष’

मुंबई : गणोशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून आणखी 18 विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. एलटीटी ते रत्नागिरीर्पयत ही विशेष गाडी धावेल. त्यामुळे प्रवाशांना अधिक दिलासा मिळणार आहे. 
00115 ट्रेन एलटीटीहून 28, 30, 31 ऑगस्ट आणि 1, 3, 4, 6, 7 आणि 8 सप्टेंबर रोजी 13.45 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी 21.50 वाजता पोहोचेल. 00116 ट्रेन रत्नागिरी येथून याच दिवशी 5.15 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे त्याच दिवशी 13.10 वाजता पोहोचेल. 
ठाणो, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर या स्थानकात ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. सेकंड क्लास चेअर कार, दोन जनरल सेकंड क्लास आणि दोन जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेम व्हॅन डबे ट्रेनला जोडण्यात येतील. या ट्रेनचे आरक्षण नंतर कळविण्यात येईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.   

 

Web Title: 18 more Ganpati 'special'