शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाख खटले प्रतीक्षेत!

By admin | Updated: June 1, 2015 02:37 IST

वेळेत आणि योग्य न्याय मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे़ उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारे पक्षकारावर अन्यायच़ मात्र न्यायालयातील

विजय मोरे, नाशिकवेळेत आणि योग्य न्याय मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे़ उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारे पक्षकारावर अन्यायच़ मात्र न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता ते केव्हा निकाली निघणार याबाबत साशंकताच आहे़ राज्यातील १,२९१ न्यायालयांमध्ये १८ लाखांहून अधिक खटले प्रलंबित असून, एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख ३५ हजार ६१३ खटले प्रलंबित आहेत़ न्यायाधीशांची कमी संख्या, अपुरे न्यायालयीन कर्मचारी, पायाभूत सुविधांचा अभाव, साक्षीदारांची गैरहजेरी, पोलीस यंत्रणेचा असमन्वय हे खटले प्रलंबित राहण्यासाठीचे प्रमुख घटक आहेत़ पण त्याबरोबरच न्यायालयीन सुट्या हादेखील महत्त्वाचा भाग आहे़ न्यायालयीन प्रक्रिया आजही ब्रिटिशांनी घालून कार्यपद्धतीनुसारच सुरू आहे़ दुसरा व चौथ्या शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्या, नाताळ, उन्हाळी एक महिना सुटीच्या कालावधीत न्यायालयांचे कामकाजच होत नाही़कोणत्याही खटल्याची सुनावणी तीनपेक्षा अधिक वेळा तहकूब करू नये, अशी तरतूद दिवाणी प्रक्रिया संहितेत आहे. मात्र, वास्तव वेगळेच आहे. पोलीस न्यायालयात मुदतीत (नव्वद दिवसांत) दोषारोपपत्र दाखल करतात. मात्र, त्यात अनेक त्रुटी असतात. सक्षमपणे पुरावे गोळा न करणे, तपास अधिकाऱ्याने घाईगडबडीत दोषारोपपत्र दाखल केल्याने त्यात चुका होणे याचा परिणाम गुन्हा सिद्धतेवर होतो़न्यायालयातील खटले निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी अव्यवहारी असल्याचे सांगून फेटाळली जाते. मात्र, आता खालच्या कोर्टात पाच आणि वरच्या कोर्टात दोन वर्षांत खटला निकाली काढला पाहिजे, असे बंधन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी नुकतेच घालून दिले आहे.प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत प्रयत्न केले जात असले तरी ते तोकडे पडतात़ न्यायालयात दाखल होणारे व निकाली निघणारे खटले यात मोठी तफावत दिसून येते़