शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

शासनाकडे दूध अनुदानाचे १७१ कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 4:13 PM

दर घसरल्याने सुरू केलेले अनुदान बंद; पश्चिम महाराष्ट्रातील २२ दुध संघांचा समावेश

ठळक मुद्देदूधदर घसरल्याने राज्य शासनाने एक आॅगस्टपासून गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यास सुरुवातबाजारात दुधाच्या दरात वाढ होत नसल्याने शासनाने सहा महिने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान सुरू ठेवले

सोलापूर: दर घसरल्याने सुरू केलेले अनुदान बंद करून दोन महिने झाले तरी अनुदानाची मागील १७१ कोटी इतकी रक्कम शासनाकडे अडकली आहे. एकट्या पश्चिम महाराष्टÑातील सहकारी व खासगी अशा २२ दूध संघांची ही रक्कम आहे.

दूधदर घसरल्याने राज्य शासनाने एक आॅगस्टपासून गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यास सुरुवात केली. बाजारात दुधाच्या दरात वाढ होत नसल्याने शासनाने सहा महिने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान सुरू ठेवले. देशात व राज्यात दूध संकलनात घट होऊ लागल्याने राज्य शासनाने दूध संघांना २० ऐवजी २२ रुपये दर देण्याचे आदेश काढले. याच आदेशात दूध संघाने २२ रुपये व शासन प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देणार असल्याचे म्हटले होते. सहा महिने प्रतिलिटर पाच रुपये व नंतर तीन महिने तीन रुपये, याप्रमाणे अनुदान जाहीर केले व एप्रिलपासून संपूर्णपणे अनुदान बंद केले. शासनाने एप्रिलपासून अनुदान बंद केल्यानंतर मे महिन्यापासून दूध खरेदी दरात वाढ होऊ लागली. ती वाढ सध्या सुरूच आहे. दरम्यान, शासनाकडून मिळणारी अनुदानाची ररक्कम अद्यापपर्यंत मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

पश्चिम महाराष्टÑातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यांमधील २२ संघांना आॅगस्ट ते जानेवारीपर्यंतचे ३४७ कोटी रुपये अनुदान वितरित केले आहे.  जानेवारीपर्यंतचे ६३ कोटी रुपये शासनाकडून अद्याप मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत १९ संघांचे प्रतिलिटर तीन रुपयांप्रमाणे १०८ कोटी रुपये शासनाकडून येणे आहे. तीन रुपये अनुदान सुरू झाल्यानंतर गोकुळ, वारणा व यशवंत सहकारी दूध संघांनी शासनाचे अनुदान नाकारले. त्यामुळे अनुदान घेणाºया दूध संघांची संख्या १९ इतकी झाली. 

दूध पंढरीचे साडेचार कोटी- सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (दूध पंढरी) शासन आदेशाप्रमाणे सहा महिने प्रतिलिटर पाच रुपये व नंतर तीन महिने प्रतिलिटर तीन रुपयांप्रमाणे अनुदान शेतकºयांच्या खात्यावर जमा केले आहे. शासन आदेशाप्रमाणे गायीच्या दुधाला २५ रुपयांचा दर दिला आहे. असे असले तरी दूध पंढरीला २० डिसेंबरपर्यंतचे अनुदान मिळाले आहे. साडेचार महिन्यांचे साडेचार कोटी रुपये अनुदान शासनाकडून आले नसल्याचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी सांगितले. 

शासनाच्या आदेशाप्रमाणे राज्यातील सहकारी दूध संघांनी दूध उत्पादकांना अनुदानासह प्रतिलिटर २५ रुपये इतका दर दिला. शासनाकडून अनुदान अद्यापही मिळाले नाही. मात्र, बहुतेक खासगी संघांनी दूध उत्पादकांना २० रुपये, २२ रुपये प्रतिलिटर व काहींनी २५ रुपये इतका दर दिला. कमी दर देणाºया खासगी संघांवर शासनाचे नियंत्रण नाही.- विनायक पाटीलसंचालक, महानंद, मुंबई 

टॅग्स :SolapurसोलापूरMilk Supplyदूध पुरवठाgovernment schemeसरकारी योजनाmilkदूध