शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१२५० कोटींची देयके रखडली

By admin | Updated: July 29, 2014 00:44 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निविदांना प्रतिसाद देत राज्यातील कंत्राटदारांनी १ हजार २५० कोटी रुपयांच्या रस्त्यांचे बांधकाम केले. परंतु या कंत्राटदारांची ही देयके वर्षभरापासून मिळालेली नाहीत.

सार्वजनिक बांधकाम : रस्त्यांच्या निविदांवर राज्यभरातील कंत्राटदारांचा बहिष्कार यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निविदांना प्रतिसाद देत राज्यातील कंत्राटदारांनी १ हजार २५० कोटी रुपयांच्या रस्त्यांचे बांधकाम केले. परंतु या कंत्राटदारांची ही देयके वर्षभरापासून मिळालेली नाहीत. आता शासनाने केवळ १८० कोटी रुपये देण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये या रकमेसाठी भांडणे उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार ढेपाळला आहे. कनिष्ठ अभियंत्यांपासून सचिवापर्यंतच्या जागा अनेक वर्ष रिक्त ठेवल्या गेल्या. आजही मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंत्यांच्या डझनावर जागा रिक्त आहेत. तर दुसरीकडे कमाईच्या जागांसाठी बोली लावली जात आहे.बांधकाम खात्याकडे निधी उपलब्ध नसताना कामे मात्र शेकडो कोटींची काढली जात आहेत. ‘मार्जीन मनी’ एवढाच स्वार्थ यामागे आहे. या स्वार्थापायी अव्वाच्या सव्वा कामे काढल्याने आजच्या घडीला राज्यातील कंत्राटदारांची शेकडो कोटींची देयके प्रलंबित आहेत. गतवर्षी पुरामुळे राज्यात मोठे नुकसान झाले. पूरग्रस्त भागात नव्या रस्त्यांची निर्मिती, जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीची सुमारे एक हजार २५० कोटी रुपयांची कामे काढली गेली. यातील एक हजार कोटी रुपयांची कामे कंत्राटदारांनी पूर्ण केली. तर बांधकाम खात्याकडे पैसाच नाही म्हणून हात आखुडता घेत काही कंत्राटदारांनी ही कामे प्रलंबित ठेवली. गेल्या वर्षभरापासून कंत्राटदारांना या कामांच्या देयकाची प्रतीक्षा आहे. परंतु बांधकाम खात्याकडे निधीच नाही. कंत्राटदारांनी अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्यानंतर आता कुठे १८० कोटी रुपये जारी करण्याची तयारी बांधकाम खात्यात सुरू आहे.मात्र या रकमेतून प्रत्येक जिल्ह्याला चार ते पाच कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. एवढासा निधी कुणाकुणाला वाटायचा असा पेच बांधकाम अभियंत्यांपुढे राहणार आहे. त्यातूनच कंत्राटदारांमधील गटबाजी व भांडणे उफाळून येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ७५० कोटी रुपये देण्याची तयारी झाली होती. मात्र ऐनवेळी त्यातील ५०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पॅकेजकडे वळविण्यात आले. केवळ २५० कोटी रुपये प्रत्यक्षात दिले गेले. त्यापेक्षाही गंभीर अवस्था यावर्षी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान थकीत देयकांच्या मागणीसाठी राज्यातील हॉटमिक्स कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निविदांवरच बहिष्कार घातला आहे. यवतमाळपासून मुंबईपर्यंत हा बहिष्कार कायम आहे. (जिल्हा प्रतिनिधी)