शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

ठपका ठेवलेल्या ठेकेदाराला १२३ कोटींची ‘वर्क आॅर्डर’!

By admin | Updated: June 2, 2015 01:55 IST

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर ‘यापुढे राखीव वस्तूंची / साहित्यांची दरनिश्चिती करण्यात येणार नाही’ असा निर्णय घेतला गेला

अतुल कुलकर्णी, मुंबईउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर ‘यापुढे राखीव वस्तूंची / साहित्यांची दरनिश्चिती करण्यात येणार नाही’ असा निर्णय घेतला गेला. या निर्णयाचा परिणाम सूर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्थेवरदेखील झाला. त्याआधारे आदिवासी विकास विभागामार्फत या संस्थेस देण्यात आलेले चिक्की पुरवठ्याचे आदेशदेखील त्याचवेळी रद्द झाले; तरीही युती सरकारने या संस्थेच्या तब्बल १२३ कोटींच्या खरेदीचे प्रस्ताव आयुक्तांनी दिले आणि मंत्रालयात ते विनातक्रार मंजूरही झाले.वजन करण्याची मशिन तर एकाच दिवशी, एकाच ठेकेदाराला दोन वेगवेगळे जीआर काढून विकत घेतली गेली. एक जीआर ६ कोटी ९२ लाखांचा तर दुसरा १८ कोटी ३७ लाखांचा काढला गेला. असाच प्रकार स्प्रिंकल्स पावडरचा. १ ग्राम पावडर ५ रु. ८७ पैसे या दराने ही पावडरदेखील १८ कोटींची खरेदी केली गेली. एमआयएस मार्गदर्शिका आणि मार्गदर्शक पुस्तिका विकत घेताना याचे कॉपीराईट भानुदास पी. टेकावडे यांच्या नावाने असताना या पुस्तकांचे कॉपीराईट मे. जगतगुरू प्रिंटिंग प्रा. लि. यांच्या नावाने आहे असे नमूद करीत १ कोटींची खरेदी केली गेली. अशी पुस्तके इतर साहित्य या प्रकारात मोडतात. सरकारच्या ग्रंथालय संचालयनालयाने यासाठी २५ टक्के सवलत मिळाली पाहिजे असे आदेश काढलेले असताना प्रत्यक्षात या ठिकाणी २०% सवलत घेतली गेली. येथेही ठेकेदाराचा ५ टक्के थेट फायदा केला गेला. असाच प्रकार कलाचेतना कॉपी, कलरिंग कृती पुस्तिकेच्या बाबतीत घडला. ज्याची ४ कोटींची खरेदी केली गेली. चटया, सतरंज्या, वॉटर प्युरिफायर यांची गरज आहे की नाही याचा कोणताही आढावा न घेता त्यांचीही करोडोंची खरेदी केली गेली. चित्रकोडी संचदेखील ४ कोटी ८९ लाख रुपयांचे खरेदी केले गेले.