शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

रक्त तपासणीमुळे ७० महिन्यांच्या कालावधीत १११ जणांचे प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 4:18 PM

महाराष्ट्रातील सर्व रक्तपेंढीमध्ये नॅट चाचणीसारख्या आधुनिक रक्त तपासणीची गरज आहे..

ठळक मुद्देनॅटच्या मदतीने रक्त तपासणी : १३०० हून अधिक लोकंना एचआयव्ही संसर्गमहाराष्ट्रात एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या केसेसमध्ये हे प्रमाण १३ टक्के रक्त देण्यापूर्वी आवश्यक काळजी घेतली नसल्यास ' हे ' आजारही रुग्णाला होण्याची शक्यता

पुणे : राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेच्या नव्या अहवालानुसार मध्ये भारतात २०१८-१९ मध्ये संक्रमण संक्रमित संसर्ग (टीटीआय) प्रक्रियेत १३०० हून अधिक लोकंना एचआयव्ही संसर्ग झाला. महाराष्ट्रात एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या केसेसमध्ये हे प्रमाण १३ टक्के होते व १६९ जणांना संसर्ग झाला. जनकल्याण रक्तपेढीने नॅटच्या मदतीने रक्त तपासणीमुळे ७० महिन्यांच्या कालावधीत १११ जणांचे प्राण वाचवले आहेत. जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.     यावेळी रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रवण सुब्रमण्यम व  रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्स हेड डॉ. संदीप सेवलीकर उपस्थित होते.महाराष्ट्रातील रक्तविषयक सुरक्षितता यावरील अहवालाच्या मते टीटीआयचा धोका कमी केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील सर्व रक्तपेंढीमध्ये नॅट चाचणीसारख्या आधुनिक रक्त तपासणीची गरज आहे. भारतात अंदाजे २५०० रक्तपेढया आहेत.  त्यातील केवळ २/३ टक्के नॅट चाचणी  करतात. देशातील व राज्यातील अनेक रुग्णालये/रक्तपेढी  यांनी नॅट तपासणी प्रक्रिया राबवलेली नाही.डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, रक्त संक्रमण हा इमर्जन्सी मेडिकल केअरचा महत्त्वाचा घटक आहे. इमर्जन्सीच्या वेळी पुरेसा रक्तपुरवठा होण्यासाठी सुनियोजित रक्त संक्रमण सेवेची गरज असते. यासाठी हे संपूर्ण क्षेत्र व विनामूल्य ऐच्छिक रक्तदानाची तयारी असणारे डोनर यांच्या वर्षभरातील सहयोगामुळेच हे केवळ शक्य होऊ शकते. सर्वांना सर्वंकष आरोग्यसेवा द्यायची असले तर प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित व दर्जेदार रक्ताचा पुरवठा होणे गरजेचे असते.

नॅट म्हणजे कायएचआयव्ही, हिपेटायटिस-बी, हिपेटायटिस-सी, मलेरिया, सिफिलिस (गुप्तरोग) हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याचे जे विविध मार्ग आहेत. त्यातील रक्त हा एक प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे रक्त देण्यापूर्वी आवश्यक काळजी घेतली नसल्यास रक्ताबरोबर हे आजारही रुग्णाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एखादा व्यक्ती रक्तदान करण्याअगोदर त्याच्या रक्ताची तपासणी केली जाते. त्याच्या रक्तातून काही विषाणू आढळले. तर त्याला रक्तदान करून दिले जात नाही. व त्या व्यक्तीला रक्तातील दोषाबद्दल कळवले जाते. हे  नॅट चाचणी तपासणीचे माध्यम आहे. 

टॅग्स :PuneपुणेHIV-AIDSएड्सHealthआरोग्यdoctorडॉक्टर