जळगाव जिल्ह्यात भाजपला खिंडार, ११ नगरसेवक हाती बांधणार शिवबंधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 06:45 PM2021-09-24T18:45:22+5:302021-09-24T18:47:37+5:30

Maharashtra Politics News: जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपाला लागलेली गळती अद्याप सुरूच आहे. आता जळगावमध्ये भाजपाला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

11 BJP corporators will join Shiv Sena In Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात भाजपला खिंडार, ११ नगरसेवक हाती बांधणार शिवबंधन 

जळगाव जिल्ह्यात भाजपला खिंडार, ११ नगरसेवक हाती बांधणार शिवबंधन 

Next

जळगाव/मुंबई - जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपाला लागलेली गळती अद्याप सुरूच आहे. आता जळगावमध्ये भाजपाला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडण्याची चिन्हे दिसत असून, जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकांमधील ११ नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे नगरसेवक हाती शिवबंधन बांधतील. ( 11 BJP corporators will join Shiv Sena In Jalgaon district)
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील ११ नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे समर्थक भाजपचे ११ नगरसेवक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकाचे भाजप नगरसेवक आज हातावर शिवबंधन बांधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा भाजपासाठी मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. 

English summary :
11 BJP corporators will join Shiv Sena In Jalgaon district

Web Title: 11 BJP corporators will join Shiv Sena In Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app