शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात अकरा विधेयकांना मंजुरी!

By admin | Updated: December 25, 2014 03:00 IST

विधेयकांना मंजुरी, विविध खात्यांविषयी घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि विदर्भाच्या विकासाला भरघोस पॅकेज देत विधिमंडळाच्या नागपुरातील

नागपूर : ११ विधेयकांना मंजुरी, विविध खात्यांविषयी घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि विदर्भाच्या विकासाला भरघोस पॅकेज देत विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. विधान परिषदेत सभापती शिवाजीराव देशमुख यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्याची घोषणा केली. पुढील अधिवेशन मुंबईत ९ मार्चपासून सुरूहोणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्याच अधिवेशनात राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांची आत्महत्या, दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद, मुंबईसाठी समिती, केळकर समितीचा अहवाल यासह विदर्भाच्या विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले, तर नागपूरसह विदर्भातील सिंचन योजनांना मार्गी लावण्याचे भरीव आश्वासन दिले. दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी निकाली निघाला. मुंबईसाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा वादही मुख्यमंत्र्यांनी निकाली काढला.८ ते २४ डिसेंबरदरम्यान झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांच्या प्रत्येकी १३ बैठका झाल्या. विधान परिषदेचे एकूण ७४ तास ५० मिनिटे, तर सभेचे एकूण ८७ तास २० मिनिटे कामकाज चालले. विधान परिषदेतील कामकाजाची रोजची सरासरी ही ५ तास ५० मिनिटे, तर सभेची ६ तास ४० मिनिटे होती. दोन्ही सभागृहांत एकूण ११ विधेयके संमत झाली. अधिवेशन कालावधीत सभागृहात सदस्यांची एकूण सरासरी उपस्थिती ८४.१९ टक्के होती. त्यात जास्तीत जास्त उपस्थिती ९३.४१ टक्के, तर कमीत कमी उपस्थिती ४७.३२ टक्के होती. (प्रतिनिधी)विशेष अधिवेशन घ्यासरकारने केळकर समितीचा अहवाल अधिवेशनात शेवटच्या दिवशी मांडला. त्यावर चर्चा घडवून आणली असती तर विदर्भालाच न्याय मिळाला असता. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची इच्छा नाही, अशी टीका करीत जानेवारी महिन्यात या अहवालासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.