शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

१०५८ सार्वजनिक गणपतींची स्थापना

By admin | Updated: August 29, 2014 01:04 IST

शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. उपराजधानीत १०५८ सार्वजनिक गणेश मंडळ गणपतींची स्थापना करणार आहेत. शहर पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

कडेकोट बंदोबस्तात होणार गणरायाचे आगमननागपूर : शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. उपराजधानीत १०५८ सार्वजनिक गणेश मंडळ गणपतींची स्थापना करणार आहेत. शहर पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवादरम्यान विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या आहेत. दहशतवाद्यांकडून गडबड करण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था ‘फुल प्रुफ ’ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्रीपासूनच पोलिसांचे साप्ताहिक अवकाश बंद करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच चितारओळ येथून गणेश मूर्ती स्थापनेसाठी आपापल्या ठिकाणी रवाना होतील. यासाठी चितारओळ, बडकस चौक, सेंट्रल एव्हेन्यू आदी ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दोसर भवन चौकात अस्थायी पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान सुरक्षेसाठी शुक्रवारी एक उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक, ३० उपनिरीक्षक, ७८३ पुरुष आणि ११२ महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय एसआरपीची एक कंपनी, ५ पोलीस निरीक्षक, १५ प्रशिक्षु पोलीस उपनिरीक्षक, २५ महिला आणि ७५ पुरुष प्रशिक्षु शिपाई उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोलिसांनी गणेश मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे आणि मेटल डिटेक्टर्स लावण्याचे आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी डीजे चा वापर करण्याची मनाईसुद्धा केली आहे. (प्रतिनिधी)