आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 16:46 IST2022-10-21T16:46:43+5:302022-10-21T16:46:53+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून भरतीचा प्रश्न प्रलंबित होता. साडे अकरा लाख तरुण या भरतीच्या प्रतिक्षेत होते

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा
मुंबई - राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाची घोषणा केली आहे. गेल्या साडे तीन वर्षात शासकीय नोकरी भरती खोळंबली होती. त्यात राज्य सरकारने पुढाकार घेत १० हजार जागा आरोग्य विभागाच्या रिक्त आहेत. त्यावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा घेऊन या जागा भरण्यात येतील.
कसं आहे भरतीचं वेळापत्रक?
१ जानेवारी ते ७ जानेवारी - भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
२५ जानेवारी ते ३० जानेवारी - उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल.
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी - पात्र उमेदवारांची यादी जाहीर
२५ मार्च आणि २६ मार्च - विविध पदांसाठी भरती परीक्षा होईल
२७ मार्च ते २७ एप्रिल - या कालावधीत उमेदवारांची निवड
गेल्या अनेक दिवसांपासून भरतीचा प्रश्न प्रलंबित होता. साडे अकरा लाख तरुण या भरतीच्या प्रतिक्षेत होते. परीक्षा शुल्क भरूनही भरती झाली नव्हती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी होती असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं.