ठाणे मेट्रोला 10 स्थानके

By Admin | Updated: June 25, 2014 00:56 IST2014-06-25T00:56:40+5:302014-06-25T00:56:40+5:30

मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणो एमएमआरडीएच्या अधिपत्त्याखाली साकार होणारे घाटकोपर ते भाईंदर या ठाण्यातून जाणा:या मेट्रोवर 1क् स्थानके असतील.

10 stations in Thane Metro | ठाणे मेट्रोला 10 स्थानके

ठाणे मेट्रोला 10 स्थानके

>ठाणो : मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणो एमएमआरडीएच्या अधिपत्त्याखाली साकार होणारे घाटकोपर ते भाईंदर या ठाण्यातून जाणा:या मेट्रोवर 1क् स्थानके असतील. तीनहात नाका ते गोल्डन डाईज हा चार स्थानकांदरम्यानचा मार्ग भुयारी, तर त्या पुढील कासारवडवलीर्पयतचा मार्ग हा एलिव्हेटेड ट्रॅक असेल. 1क्.87 किमीएवढी या मार्गाची लांबी असणार आहे. मेट्रोचा हा मार्ग वडाळ्याहून घाटकोपरमार्गे ठाण्यात येईल. 
याबाबतची माहिती देताना एमएमआरडीएच्या अधिका:यांनी सांगितले की, तीनहात नाका ते गोल्डन डाईज या स्थानकांदरम्यानचा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने व तेथे आवश्यक ती जमीन मिळणो शक्य नसल्याने तेथील मार्ग भुयारी स्वरूपाचा करावा लागणार आहे. मेट्रो प्रकल्पातील पाचव्या टप्प्यात ठाण्याची मेट्रो साकार होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी यांनी दिली आहे. 
घाटकोपरपासून निघणारा मेट्रोचा मार्ग लाल बहाद्दूर शास्त्री महामार्गाला समांतर असा, परंतु भुयारी स्वरूपाचा असेल व त्याचे ठाण्यातील पहिले स्थानक तीनहात नाका असेल. त्यानंतर वागळे इस्टेट, कॅडबरी जंक्शन, गोल्डन डाईज, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, पातलीपाडा, वाघबीळ, कासारवडवली अशी नऊ स्थानके असतील. गोल्डन डाईज ते कासारवडवलीदरम्यानचा मेट्रोचा मार्ग घोडबंदर रोडला समांतर असेल.
 
च्जागेच्या टंचाईमुळे त्याची उभारणी एलिव्हेटेड तंत्रने केली जाणार आहे. हीच मेट्रो पुढे दहिसर-बोरीवलीर्पयत नेण्यात येणार आहे. या मेट्रोसाठी एमएमआरडीएने स्वतंत्र सोय केली आहे आणि वर्षभरातच तिच्या कामाचा शुभारंभ होईल. मेट्रोच्या कारशेडसाठी ओवळा येथे भूखंड आरक्षित असून, त्यावर असलेली अतिक्रमणो हटवून तो लवकर मुक्त केला जाईल.
 
च् याबाबत ओवळा-माजिवडय़ाचे आ. प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे की, याबाबतचा मुद्दा मी अनेकदा विधानसभेत उपस्थित केला व नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत ठोस घोषणा केली. मेट्रोचा हा मार्ग वडाळ्याहून घाटकोपरमार्गे ठाण्यात येईल. आवश्यक जमीन नसल्याने भुयारी मार्गाचा अवलंब.

Web Title: 10 stations in Thane Metro