शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

१0 टक्केच लाचखोरांवर दोषारोपपत्र!

By admin | Updated: July 28, 2014 04:03 IST

लाचखोर अधिकारी रंगेहात पकडला...अशा आशयाच्या बातम्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी माध्यमांना दिल्या जातात

सुदाम देशमुख, अहमदनगरलाचखोर अधिकारी रंगेहात पकडला...अशा आशयाच्या बातम्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी माध्यमांना दिल्या जातात. मात्र लाचखोर अधिकाऱ्याला अटक होते, तो जामिनावर सुटतो...आणि काही काळानंतर समाजात उजळ माथ्याने फिरू लागतो. त्याचे कोणालाच सोयरसुतक राहत नाही. नंतर तपास थंड होतो. प्रकरणाचे पुढे काय होते....तर काहीच नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात पकडलेल्या लाचखोरांपैकी फक्त १० टक्के अधिकाऱ्यांवर दोषारोपपत्र दाखल झाले आहे. ही प्रकरणेही पुढे सरकली नाहीत.लाचखोरांच्या ७० टक्के प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. त्यामुळे लाचखोर अधिकारी-कर्मचारी उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. २०१३-१४ मध्ये आतापर्यंत राज्यात ७०४ लाचखोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २८ कर्मचाऱ्यांची अपसंपदा जप्त करण्यात आली. अन्य भ्रष्टाचाराची २८ प्रकरणे आहेत. ७०४ गुन्ह्यांमध्ये ४८४ प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. म्हणजे जवळपास ७० टक्के प्रकरणांमध्ये तपास अपूर्ण आहे. अभियोगपूर्व मंजुरीकरिता १२२ प्रकरणे प्रलंबित आहेत. ७१ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले असून त्याचाही अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही.