Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार; तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 17:25 IST2020-05-10T17:24:53+5:302020-05-10T17:25:59+5:30
Vidhan Parishad Election: महाराष्ट्र विकास आघाडीचे सहा उमेदवार असून यामध्ये दोन उमेदवार काँग्रेसचे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार; तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक
मुंबई : विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह भाजपानेही उमेदवारी जाहीर केली आहे. या ९ जागांसाठी १० उमेदवार झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून आज हा तिढा सोडविण्यासाठी महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये बैठक होणार आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सहा उमेदवार असून यामध्ये दोन उमेदवार काँग्रेसचे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मात्र, काँग्रेस दोन उमेदवार देण्यासाठी अडून बसली आहे. यामुळे उद्धव ठाकरेच नाराज असल्याचे समजत असून त्यांनी मी निवडणूक लढवणार नसल्याचा निरोप काँग्रेसच्या नेत्यांकडे पोहोचविला आहे. आता हा तिढा सोडविण्यासाठी आज सायंकाळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत, एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर हे उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यामध्ये काँग्रेस माघार घेते की १७४ मतांची गोळाबेरीज केली जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Vidhan Parishad Election: ...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवावी, भाजपाचा युतीधर्मावरून टोला
Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी
पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली