Vidhan Parishad Election:...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवून आघाडीधर्म पाळावा; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 04:30 PM2020-05-10T16:30:29+5:302020-05-10T18:13:28+5:30

Vidhan Parishad Election: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. मात्र काँग्रेसने दोन उमेदवार उभे केल्यामुळे निवडणूक अटळ आहे. उद्धव ठाकरेंनी या संबंधित मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे.

Shiv Sena should leave one seat; BJP's Mla Atul Bhatkhalkar to Uddhav Thackrey hrb | Vidhan Parishad Election:...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवून आघाडीधर्म पाळावा; भाजपाचा टोला

Vidhan Parishad Election:...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवून आघाडीधर्म पाळावा; भाजपाचा टोला

googlenewsNext

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या ९ जागांसाठी १० उमेदवार झाल्याने शिवसेना आणि काँग्रेसमध्ये माघारीनाट्यावरून वाद सुरु झाला आहे. यातच शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला डिवचल्याने या वादात आता भाजपानेही उडी घेतली आहे. 


विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. मात्र काँग्रेसने दोन उमेदवार उभे केल्यामुळे निवडणूक अटळ आहे. उद्धव ठाकरेंनी या संबंधित मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही मराठी वृत्तावाहिनींनुसार काँग्रेस दोन जागा लढवण्यास ठाम राहिल्यास मी निवडणूक लढवणार नाही, असा निरोप देखील उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत शिवसेनेकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. यावर आता भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. 


विधान परिषदेच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जुंपली आहे. काँग्रेस जे करतेय त्याला राजकारण करणे म्हणतात. असंगाशी संग केल्यावर यापेक्षा वेगळे काही होण्याची शक्यता नसते, असा टोला भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 


तसेच त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला असून विधानसभा निवडणुकीच युती धर्म न पाळल्याचा वचपा काढला आहे. महाविकास आघाडीत विधान परिषद निवडणुकीवरून कलगीतुरा सुरू आहे. संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी 'कार्यकारी' आक्रमकता गुंडाळून संवेदनशील भाषेवर आले आहेत, असा टोला लगावला. पुढे . एवढं टेन्शन घेण्याचे कारण काय? शिवसेनेने मनाचा मोठेपणा दाखवून एक जागा कमी लढावी आणि आघाडीधर्म तरी पाळावा, असा टोला लगावला आहे.  भाजपाकडे चार जागा जिंकून येतील एवढ्या जागा नाहीत, त्यांनी एक जागा कमी लढावी असं राऊत म्हणाले होते.

 

महत्वाच्या बातम्या...

Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी

पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली

Web Title: Shiv Sena should leave one seat; BJP's Mla Atul Bhatkhalkar to Uddhav Thackrey hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.