मंत्र्यांच्या आयपॅडसाठी १ कोटी ६ लाख; शासनाच्या ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 08:44 IST2025-06-05T08:44:06+5:302025-06-05T08:44:40+5:30

साहित्यासह एका आयपॅडची किंमत २ लाख १३ हजार रुपये इतकी आहे.

1 crore 60 lakh for ministers iPads as Expenditure for implementation of maharashtra government e-cabinet system | मंत्र्यांच्या आयपॅडसाठी १ कोटी ६ लाख; शासनाच्या ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खर्च

मंत्र्यांच्या आयपॅडसाठी १ कोटी ६ लाख; शासनाच्या ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य शासनाच्या ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी मंत्री, राज्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकरिता ॲपल ब्रँडचे आयपॅड आणि संबंधित वस्तू खरेदी करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. साहित्यासह एका आयपॅडची किंमत २ लाख १३ हजार रुपये इतकी आहे.

मंत्र्यांसाठी असे ५० आयपॅड खरेदी केले जाणार  आहेत. त्यांची किंमत १ कोटी ६ लाख ५७ हजार होत आहे. आयपॅडसोबतच मॅजिक की-बोर्ड, ॲपल पेन्सिल, कव्हर, ॲडप्टर आणि केबल दिले जाणार आहे. या खरेदीसाठी रेडियस सिस्टम्स या सेवा पुरवठादार संस्थेला पुरवठा कंत्राट देण्यात आले.

यासंदर्भात ९ एप्रिल २०२५ रोजी पहिली ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.  तांत्रिक छाननीमध्ये एकही निविदाकार पात्र न ठरल्याने १३ मे २०२५ रोजी पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात आली.  या निविदेनुसार प्राप्त अर्जांच्या तांत्रिक आणि व्यावसायिक छाननीनंतर रेडियस सिस्टम्सला पात्र ठरवण्यात आले.

एका आयपॅडची अशी आहे किंमत

  • ॲपल आयपॅड     १,६५,८४३
  • मॅजिक की-बोर्ड    ३१,१८७
  • ॲपल पेन्सिल    ७,२६८
  • ॲपल कव्हर    ८,८५०
  • ॲडप्टर    १.१८
  • केबल    १.१८

Web Title: 1 crore 60 lakh for ministers iPads as Expenditure for implementation of maharashtra government e-cabinet system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.