'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:27 IST2025-04-30T16:20:03+5:302025-04-30T16:27:35+5:30
Pahalgam Terror Attack : खरे तर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून आणि कलमा पढायला सांगून निष्पाप आणि निरपराध लोकांना मारल्याची घटना समोर आली होती.

'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
काश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. यातच मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाने वादग्रस्त पोस्टर लावले आहे. भापळमध्ये लावण्यात आलेल्या या पोस्टरवर, 'अब तो नाम पूछना पडेगा', असे लिहिण्यात आले आहे.
नेमकं काय आहे पोस्टरवर? -
खरे तर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून आणि कलमा पढायला सांगून निष्पाप आणि निरपराध लोकांना मारल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्यात 26 जणांना त्यांचा धर्म विचारून आणि त्यांना कलमा न पढता आल्याने ममारण्यात आले. यामुळे भोपाळमध्येही संतापाची लाट आहे. भोपाळमध्ये जे पोस्टर लावण्यात आले आहे त्यावर, 'आदत डालिए नाम पूछने की..., बच्चों के सुरक्षित भविष्य के लिए... अब तो नाम पूछना ही पड़ेगा.'
भोपाळमधील रस्ते आणि चौकात या पोस्टर्सच्या माध्यमाने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आक्रोश व्यक्त केला आहे. या पोस्टरवर करनाल येथील विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नीचा फोटो आहे. हा फोटो बघून संपूर्ण देश हळहळला होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांच्यावर गोळी झाडली होती. तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्या शेजारी बसली होती. हाच फोटो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आपल्या पोस्टरवर लावला आहे.
करण्यात आलं होतं भोपाळ बंदचं आवाहन -
पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भोपालमध्ये 26 तारखेला निदर्शन करत भोपाल बंदचे आवाहन करण्यात आले आह. यानंतर, शनिवारी अर्धादिवस बाजार बंद होता.