शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 8:58 PM

"काही मांध्यमांतील वृत्तांनुसार, इंडी अलायन्स 'वन इयर, वन पीएम' फॉर्म्युला तयार करत आहे. अर्थात पहिल्या वर्षात एक पीएम, दुसऱ्या वर्षी दुसरा पीएम, तिसऱ्या वर्षी तिसरा पीएम, चौथ्या वर्षी चौथा पीएम, पाचव्या वर्षी पाचवा पीएम. आपणच सांगा देशाचे काय होणार? देश टिकेल का?"

हे लोक (I.N.D.I.A.) पंतप्रधान पदाच्या खुर्चीचाही लिलाव करण्याच्या तयारीत आहेत आणि 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करत आहेत. अर्थात दर वर्षी एक नवा पंतप्रधान. एक वर बसेल आणि चार लोक खुर्चीचे पाय पकडून खाली बसतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या I.N.D.I.A. वर जोरदार प्रहार केला आहे. ते मध्यप्रदेशातील बैतूल येथील प्रचारसभेत बोलत होते. 

सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, 'आपला आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. जनता-जनार्दन हे परमेश्वराचे रूप आहे आणि जनता-जनार्दन जेव्हा आशीर्वाद देते तेव्हा तो साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद असतो. आजकाल आशीर्वाद देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कमळाचे बटण दाबून मोदींना आशीर्वाद द्या. आपल्या एका मताने भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. आपल्या एका मताने परदेशात भारताचा डंका वाजला. आपल्या एका मताने सीमेवर डोळे वटारून बघणाऱ्या शत्रूला धडा शिकवला. आपल्या एका मताने 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येतील भव्य मंदिरात रामललांची प्रतिष्ठापना झाली.'

'ते' पंतप्रधान पदाच्या खुर्चीचा लिलाव करण्यात व्यस्त - विरोधकांच्या I.N.D.I.A. वर हल्ला चढवताना मोदी म्हणाले, "आपल्याला एक गोष्ट ऐकूण हसायला येईल आणि भीतीही वाटेल. काही मांध्यमांतील वृत्तांनुसार, इंडी अलायन्स 'वन इयर, वन पीएम' फॉर्म्युला तयार करत आहे. अर्थात पहिल्या वर्षात एक पीएम, दुसऱ्या वर्षी दुसरा पीएम, तिसऱ्या वर्षी तिसरा पीएम, चौथ्या वर्षी चौथा पीएम, पाचव्या वर्षी पाचवा पीएम. आपणच सांगा देशाचे काय होणार? देश टिकेल का? आपली स्वप्न टिकतील का? आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित राहील का? ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीचा लिलाव करण्यात व्यस्त आहेत."

धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प - तत्पूर्वी, सागर येथील एका प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले, "आज काँग्रेसचे एक असे सत्य देशासमोर आले आहे, जे ऐकून देशातील प्रत्येक नागरिक अवाक झाला आहे. धर्माच्या आधारावर कुणालाही आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे आपल्या संविधानात स्पष्टपणे नमूद आहे. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः धर्माच्या आधारावर आरक्षणाच्या विरोधात होते. मात्र, काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत."

OBC चा हक्क हिसकावून मुस्लिमांना दिला -पीएम मोदी म्हणाले, "गेल्या वेळी कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण दिले होते. यासाठी काँग्रेसने मागच्या दाराने आणि बेकायदेशीरपणे चलाखी केली होती. ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा गुन्हा काँग्रेसने केला होता. यासाठी त्यांनी मुस्लिमांच्या सर्व जातींना ओबीसी कोट्यात टाकले आहे. असे करून त्यांनी ओबीसींचे मोठे अधिकार हिरावून घेतले आणि धर्माच्या आधारावर दिले. हाच फॉर्म्युला संपूर्ण देशात लागू करण्याची काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेस OBC प्रवर्गाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांनी OBC समाजाचा हक्क हिरावला आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाची हत्या केली आहे. संविधानाचा अनादर केला आहे आणि बाबासाहेबांचाही घोर अपमान केला आहे."

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी