काय सांगता? मोबाईल शोरूममध्ये भन्नाट ऑफर; स्मार्टफोनसह 2 किलो टोमॅटो मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 10:47 AM2023-07-09T10:47:32+5:302023-07-09T10:55:45+5:30

मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची नवीन भन्नाट ऑफर आणली आहे.

buy smartphone get 2 kg tomatoes free offer in mobile showroom ashoknagar | काय सांगता? मोबाईल शोरूममध्ये भन्नाट ऑफर; स्मार्टफोनसह 2 किलो टोमॅटो मोफत

फोटो - NBT

googlenewsNext

टोमॅटोच्या किमती आता देशभरात सर्वत्रच खूप वाढल्या आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशात टोमॅटो महाग झाल्यानंतर आता शहरातील मोबाईल शोरूम ऑपरेटरने ग्राहकांसाठी अनोखी ऑफर दिली असून तिची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची नवीन भन्नाट ऑफर आणली आहे. शहरात टोमॅटोचे भाव 160 रुपयांच्या पुढे गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक नगर येथील भाजी मंडईत टोमॅटो 160 रुपये किलोने विकला जात आहे. शहरातील अभिषेक मोबाईल शॉपमधील तरुण व्यावसायिक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, "आजच्या जगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल शोरूममध्ये विविध ऑफर्स दिल्या जातात."

 स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत

"अशा स्पर्धेच्या काळात जेव्हा आम्हाला कळलं की टोमॅटोचे भाव वाढले आहेत आणि बाजारात टोमॅटो जवळपास 160 रुपये किलोने विकला जात आहे, तेव्हा आम्ही स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय घेतला. शोरूमने या गोष्टीच्या प्रचारासाठी दुकानाबाहेर बॅनरही लावले."

ग्राहकांची वाढली संख्या

शोरूमचालक सांगतात की, जेव्हापासून त्यांनी दुकानात ही योजना लागू केली आहे, तेव्हापासून ग्राहकांची संख्या वाढली आहे, या काळात अनेक लोक येऊन विचारत आहेत की, या दुकानात टोमॅटोची ऑफर सुरू आहे, ती रोज आहे का? ग्राहकांना 50 किलो पेक्षा जास्त टोमॅटो ऑफर म्हणून देण्यात येणार आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: buy smartphone get 2 kg tomatoes free offer in mobile showroom ashoknagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.