शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी वापरा या आयडिया !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 3:56 PM

शहरांमध्ये असलेल्या छोट्या जागेमुळे कपडे वाळवायला जास्त अडचण येते. परिणामी कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी येण्यासारखे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स वापरा आणि पावसाळा अधिक आनंददायी बनवा. 

पुणे :  पावसाळा म्हटलं की सर्वात अडचण होते ती कपडे वाळवण्याची.अशावेळी बाहेरच्या चिखलामुळे कपडे तर खराब होणे टाळता येत नाही आणि हवेतल्या आद्रतेमुळे वाळतही नाहीत. विशेषतः शहरांमध्ये असलेल्या छोट्या जागेमुळे कपडे वाळवायला जास्त अडचण येते. परिणामी कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी येण्यासारखे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स वापरा आणि पावसाळा अधिक आनंददायी बनवा. 

पाणी निथळणे महत्वाचे :

कपडे वाळण्यासाठी पाणी निथळणे महत्वाचे आहे.कारण त्यात पाणी असेल तर वाळणे मुश्किल होते. अशावेळी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले असतील तर दोनवेळा  ड्राय मोडवर फिरवून घ्यावेत. हाताने धुतले असतील तर वाळत घालण्याआधी उंच जागी ठेवून निथळून घ्या आणि शक्यतो जमेल इतके पिळून, झटकून वाळत घाला. 

हँगरचा वापर करा :

कपडे खूप असतात आणि जागा कमी असते त्यावेळी हँगर वापरता येतील.विशेषत: छोटे कपडे आणि अंतर्वस्त्र हँगरला टांगून अडकवता येतील. यामुळे त्यांची जागा मोठ्या कपड्यांना वापरायला मिळते.

घरात आणताना घ्या अशी काळजी :

कपडे ९० टक्के वाळले असतील तर ते घरात वाळवण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. अशावेळी ते कपडे हँगरला लावून फॅनखाली ठेवा. मात्र ते ९० टक्के वाळलेले असतील तरच आत आणा. ज्या खोलीत कपडे वाळत घातले आहेत त्या सर्व खिडक्या, दारे उघडी ठेवा. त्यामुळे हवा खिळती राहील. 

दुर्गंधी टाळण्यासाठी :

अनेकदा ओलसर कपडे जागेच्या अभावी घडी करून कपाटात ठेवले जातात किंवा कपडे खोलीत वाळत घातल्यास त्यांना कुबट वास येतो. अशावेळी कपडे असणाऱ्या खोलीत धूप लावून एका बाजूला ठेवा. त्यामुळे कपड्यांना सुगंध येत राहील. मात्र धूप कपड्यांजवळ लावू नका. त्यामुळे आगीसारखी दुर्घटना घडू शकते. याशिवाय खडे मीठ एका कोपऱ्यात ठेवले तरही दुर्गंध कमी येतो. मीठ आद्रता शोषून घेत असल्यामुळे हवा कोरडी राहण्यास मदत होते. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसHealth Tipsहेल्थ टिप्स