शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रत्येकाचा असतो 'स्वत:चा असा जंतूंचा ढग' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:15 IST

जंतूंच्या या ढगाचा अभ्यास करण्यासाठी एक काड्यापेटीएवढे यंत्र १४ लोकांना देण्यात आले होते. हे यंत्र हाताला लावून हे लोक सर्वत्र जात असत.

न्यू यॉकर्- तुम्ही दररोज भरपूर वेळ शॉवरखाली किंवा गरम पाण्यानं, सुवासिक साबणानं, उटण्यानं अंघोळ करत असाल, पण म्हणजे तुम्ही स्वच्छ झालात असे नाही. आपण प्रत्येक जण स्वत:चा असा एक सुक्ष्मजीवजंतू, विषाणू, जीवाणू, बुरशी, रसायनांनी बनलेला एक ढग बरोबर घेऊन जात असतो. आपल्याबरोबर हे सुक्ष्मजीव, वनस्पतींचे अंश, रसायने आयुष्यभर फिरत असतात असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.यामध्ये काही स्वयंसेवकांना दिवसभर परिधान करण्यासाठी एक यंत्र देण्यात आले होते. दिवसभरात ती व्यक्तीच्या भोवतीच्या वातावरणातील नमुने त्याद्वारे घेण्यात आले. त्या नमुन्यांचे जेनेटिक अनालसिस करण्यात आल्यानंतर प्रत्येक माणूस बॅक्टेरिया, व्हायरस, बुरशी, रसायने, वनस्पतींचे सूक्ष्मअंश आणि इतकेच नव्हे तर अत्यंत सुक्ष्म प्राणीही आपल्याबरोबर वागवत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या लोकांच्या नमुन्यांमध्ये फरक असल्याचेही दिसून आले. हा एक अत्यंत रोचक अभ्यास म्हणावा लागेल असे मत न्यू यॉर्कच्या साऊथ नासाऊ कम्युनिटिज हॉस्पिटल येथील चिफ आॅफ मेडिसिन डॉ. आरोन ग्लॅट यांनी व्यक्त केले. ते इन्फेक्शियस डिसिजेस सोसायटी आॅफ अमेरिकाचे प्रवक्तेही आहेत. या अभ्यासामुळे कोणते वातावरण आपल्या आरोग्याला घातक आहे हे समजणे सोपे जाईल असे ग्लॅट यांनी याबद्दल मत व्यक्त केले.पर्यावरणाचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल अभ्यास होणं गरजेचं आहे, असे स्टॅनफर्ड युनिवर्सिटी स्कूल आॅफ मेडिसिन येथील वरिष्ठ संशोधक मायकल स्नायडर यांनी मत व्यक्त केले. जंतूंच्या या ढगाचा अभ्यास करण्यासाठी एक काड्यापेटीएवढे यंत्र १४ लोकांना देण्यात आले होते. हे यंत्र हाताला लावून हे लोक सर्वत्र जात असत. स्नायडर यांनीही हे यंत्र २ वर्षे वापरले. या यंत्रात अनेक फिल्टर बसवण्यात आले होते. त्या फिल्टरनी आसपासच्या वातावरणातील नमुने गोळा केले या नमुन्याचा  जेनेटिक अनालसिस आणि केमिकल प्रोफायलिंगसाठी वापर करण्यात आला. जंतूंबरोबरच प्रत्येक व्यक्तीच्या आसपास डीईईटी हे किडे मारणारं रसायन असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते सर्वत्र पसरल्याचं दिसल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला असे स्नायडर म्हणतात. त्यांच्या घरातच जीवाणूंपेक्षा बुरशीचे अंश जास्त असल्याचं आढळलं

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स