शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाव खरेदी केंद्रावर तूर खरेदी शून्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

गत खरीप हंगामात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे आणि ऐन काढणीच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनला फटका बसला. त्याचबरोबर काही प्रमाणात ...

गत खरीप हंगामात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे आणि ऐन काढणीच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनला फटका बसला. त्याचबरोबर काही प्रमाणात तुरीवरही परिणाम झाला. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, तुरीची आवकही घटली. आवक कमी झाली आणि मागणी वाढली की दरात वाढ होते, या अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे बाजार समित्यांत तुरीच्या दरात वाढ झाली. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ६ हजार रुपये प्रति क्विंटल भावापेक्षा बाजारपेठेत अधिक भाव मिळू लागला.

शेतक-यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून नाफेडच्या वतीने जिल्ह्यात १६ आधारभूत खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. सदरील केंद्रावर जिल्ह्यातील २ हजार ७०० शेतक-यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. परंतु, खुल्या बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने शेतक-यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन आणि तुरीची एक रुपयाचीही खरेदी होऊ शकली नाही.

सर्वसाधारण दर ६ हजार ७८० रुपये...

सध्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक २ हजार ५३७ क्विंटलपर्यंत होत आहे. कमाल भाव ६ हजार ९००, सर्वसाधारण ६ हजार ७८० तर किमान दर ६ हजार ३११ रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा शेतक-यांच्या पदरी क्विंटलमागे ७८० रुपये अधिक पडत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी केवळ नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणीच केली आहे.

शेतक-यांनी फिरविली पाठ...

दरवर्षी खरेदी केंद्रावर सोयाबीन, तूर, हरभरा विक्रीसाठी रांगा लागत असतात. परंतु, यंदा बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने एकाही शेतक-याने तूर तसेच सोयाबीन विक्री केली नाही. तूर विक्रीसाठी २७०० शेतक-यांनी नोंदणी केली होती, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय.ई. सुमठाणे यांनी सांगितले.