शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Latur: मोबाईलवर स्टेट्स ठेवून तरुणाची टेम्पोमध्ये आत्महत्या, लातूर- औसा महामार्गावरील धक्कादायक घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 01:47 IST

लातूर -औसा महामार्गावर एका ३२ वर्षीय तरुणाने टेम्पोमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

"मी आत्महत्या करत आहे", असे स्टेटस मोबाईलवर ठेवून एका ३२ वर्षीय तरुणाने स्वतःच्याच टेम्पोला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. औसा-लातूर महामार्गावरील लिंबोळी पेंड कारखान्याजवळ ही घटना घडली असून, वयोवृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील नांदगाव येथील गजानन मारवाडी (वय ३२) हा तरुण आपल्या मालकीच्या आयशर टेम्पोमध्ये (क्र. MH 26 CH 2192) गुळी भरून सोलापूरच्या दिशेने जात होता. नेहमीप्रमाणे तो या मार्गावरून मालवाहतूक करत असे. मात्र, रविवारी रात्री औशाजवळ आल्यावर त्याने आपला टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला. टेम्पोची साईड लाईट चालू ठेवून, पाठीमागच्या बाजूस असलेल्या दोरीने त्याने गळफास घेतला.

४ तास आधीच दिले होते मृत्यूचे संकेत

गजाननने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सुमारे चार तास आधी आपल्या मोबाईलवर "मी आत्महत्या करत आहे" असे स्टेटस ठेवले होते. तोपर्यंत तो सोलापूरच्या दिशेने प्रवास करत होता. वाटेतच त्याने टेम्पो थांबवून आपले आयुष्य संपवले. रात्री ११ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

मयत गजानन हा अविवाहित होता आणि त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या वडिलांनी अत्यंत कष्टाने आपल्या सात मुलींची लग्ने लावून दिली होती. घराचा आणि वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार असलेल्या गजाननला त्यांनी काही महिन्यांपूर्वीच व्यवसायासाठी आयशर टेम्पो घेऊन दिला होता. मात्र, व्यवसायात जम बसवण्यापूर्वीच गजाननने मृत्यूला कवटाळल्याने वृद्ध माता-पित्यांचे छत्र हरपले आहे.

पोलीस कारवाई

घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस ठाण्याचे फौजदार भाऊसाहेब माळवदकर आणि बीट अंमलदार रामकृष्ण घुटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी औसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. गजाननने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Youth commits suicide in tempo after posting status.

Web Summary : A 32-year-old man committed suicide in his tempo on the Latur-Ausa highway after posting a suicidal status. Financial struggles and family hardship are suspected factors. Police are investigating.
टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र