किनगाव येथे आठवडा बाजारात ‘फिजिकल डिस्टन्स’चा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:24 AM2021-02-25T04:24:39+5:302021-02-25T04:24:39+5:30

किनगाव येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजारासह इतर ठिकाणी नागरिक मास्क न वापरताच वावरताना दिसून आले. परिणामी, कोरोनाचा फैलाव ...

Weekly market in Kingaon is full of 'physical distance' | किनगाव येथे आठवडा बाजारात ‘फिजिकल डिस्टन्स’चा बोजवारा

किनगाव येथे आठवडा बाजारात ‘फिजिकल डिस्टन्स’चा बोजवारा

googlenewsNext

किनगाव येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजारासह इतर ठिकाणी नागरिक मास्क न वापरताच वावरताना दिसून आले. परिणामी, कोरोनाचा फैलाव होण्याची भीती जाणकारांतून व्यक्त हाेत आहे. बुधवारी किनगाव येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरताे. या बाजारामध्ये सर्रासपणे नागरिकांनी मास्क न वापरताच बाजारहाट करत असल्याचे चित्र दिसून आले. किनगावमध्ये सध्या तीन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज पंचवीस ते तीस रुग्णांची आरटीपीसीआर व रॅपिड टेस्ट केली जात आहे. बाजाराशिवाय गावातही नागरिक विनामास्क फिरत आहेत. फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाल्याचे चित्र किनगाव येथील बाजारात दिसून आले. ग्रामपंचायतीच्या वतीने गावांमध्ये ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, याकडे सर्रासपणे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत.

नागरिकांनी मास्कचा वापर करावा...

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज पंचवीस आरटीपीसीआर आणि चार ते पाच रॅपिड टेस्ट केल्या जात आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर नियमितपणे करावा, फिजिकल डिस्टन्स पाळावे. योग्य आहार घ्यावा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच वातावरण बदलामुळे सर्दी,खोकला रोगाचे प्रमाण वाढले आहे. घाबरून न जाता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन तपासणी करून घ्यावी.

- डॉ. प्रमोद सांगवीकर, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, किनगाव

नागरिकांनी नियमांचे पालन करावे...

शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत किनगाव येथील दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला असून, नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करावे. कोरोनापासून स्वतःसह कुटुंबाला सुरक्षित ठेवावे

-किशोर मुंडे, सरपंच, किनगाव

Web Title: Weekly market in Kingaon is full of 'physical distance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.