ज्येष्ठांसाठी गाव तेथे लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:16+5:302021-06-09T04:25:16+5:30

शिरूर अनंतपाळ तालुक्यात कोविड लसीकरणास वेग यावा म्हणून, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आरोग्य विभागासह कोरोना नियंत्रण ...

Village vaccination campaign for seniors there | ज्येष्ठांसाठी गाव तेथे लसीकरण मोहीम

ज्येष्ठांसाठी गाव तेथे लसीकरण मोहीम

शिरूर अनंतपाळ तालुक्यात कोविड लसीकरणास वेग यावा म्हणून, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आरोग्य विभागासह कोरोना नियंत्रण समितीच्या अधिकारी, तसेच पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे. लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून माझा गाव माझी लस हा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे साकोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या विविध गावात लसीकरण मोहिमेचा वेग वाढला आहे. दैठणा लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.वाघमारे, डॉ. मंत्रे, डॉ शिरोळकर, सरपंच लक्ष्मीबाई बिरादार, आशिष बिरादार, परमेश्वर बिरादार, अमोल बिरादार, तुषार ससाणे, माधव बिरादार, आरोग्य सहाय्यक जाधव, गोचडे यांची उपस्थिती होती. लसीकरणाचे काम डॉ. आम्रपाली सुतार यांनी केले आहे. आभार आशिष बिरादार यांनी मानले.

लसीकरणास ज्येष्ठांचा प्रतिसाद

गाव तेथे लसीकरण या मोहिमेंतर्गत सोमवारी दैठणा येथे घेण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास प्रतिसाद मिळाला असून,ज्येष्ठ नागरीक, महिला यांच्यासह शंभर ज्येष्ठांचे लसीकरण डॉ. सुतार यांनी केले. यामध्ये जास्तीत जास्त महिलांचा समावेश होता. त्यामुळे ज्येष्ठांसह महिलांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रांतर्गत १९ पैकी १५ गावात लसीकरण...

साकोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्र असून, १९ गावांचा समावेश आहे. ‘माझा गाव माझी लस’ या उपक्रमांतर्गत गाव तेथे लसीकरण मोहिमेद्वारे आजपर्यंत १९ पैकी १५ गावातील ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे डॉ. वाघमारे, सभापती गोविंदराव चिलकूरे यांनी सांगितले.

Web Title: Village vaccination campaign for seniors there