ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणीस निलंग्यात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST2021-01-23T04:19:37+5:302021-01-23T04:19:37+5:30

या योजनेमुळे राज्यातील सुमारे ४० हजार गावांतील गावठाणचे जीआईएस आधारित अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार असून, ग्रामीण भागातील जमीन मालकांना ...

Village survey by drone started in Nilanga | ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणीस निलंग्यात प्रारंभ

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणीस निलंग्यात प्रारंभ

या योजनेमुळे राज्यातील सुमारे ४० हजार गावांतील गावठाणचे जीआईएस आधारित अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार असून, ग्रामीण भागातील जमीन मालकांना स्वतःच्या मालकीच्या जागेची मिळकत पत्रिका मिळणार आहे, तसेच गावकऱ्यांसाठी गावठाणातील प्रत्येक मिळकतीचा नकाशा, सनद आणि मिळकत पत्रिका तयार होणार आहे. गावठाणातील घराच्या बांधकामासाठी नकाशा उपलब्ध होणार असून, ग्रामस्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. त्यामुळे बँकेकडून कर्ज उपलब्ध होण्यासाठी अधिक सुविधा मिळणार आहेत. खरेदी-विक्री सुलभ होऊन फसवणूक टाळली जाणार आहे. मालकी हक्काचा पुरावा मिळाल्यामुळे आपापसातील वाद थांबणार आहेत. त्यासाठी तालुक्यातील ज्या गावात भूमी अभिलेख अधिकारी येतील त्या दिवशी ग्रामसेवक, सरपंच, तलाठ्यांनी चुना मार्किंगसाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपअधीक्षक अविनाश मिसाळ यांनी केले आहे.

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणी प्रकल्प राबविल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक गोष्टींचा लाभ होऊन मिळकतीच्या नकाशामुळे सीमा निश्चित होऊन मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल. ही योजना ३० मार्चपर्यंत असल्याने या योजनेपासून एकही गाव, वाडी, तांडा वंचित राहणार नाही, असे भूमी अभिलेख विभागाचे अविनाश मिसाळ यांनी सांगितले.

Web Title: Village survey by drone started in Nilanga