शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

जमीन कसायची कशी? बैलजोडी परवडेना; वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावर कोळपणीचा जू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:51 IST

मशागतीचा खर्च आवाक्याबाहेर; प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर जमीन कसायची कशी, हा यक्ष प्रश्न

- सलीम सय्यदअहमदपूर (जि. लातूर) : पेरणी, मशागतीचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर जमीन कसायची कशी, हा यक्ष प्रश्न सध्या उभा आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण अहमदपूर तालुक्यातील हडोळती शिवारात रविवारी पहायला मिळाले. पंचाहत्तरी गाठलेले अंबादास पवार यांनी स्वतःस कोळपणीच्या कामाला जुंपून घेतले आहे. सोबतीला पत्नी मुक्ताबाई होत्या.

अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास गोविंद पवार (७५) यांना गावानजीक सर्व्हे क्र. ५४ मध्ये २ एकर ९ गुंठे शेती आहे. कुटुंबात त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पवार, सून आणि दोन नातू आहेत. मुलगा रत्नाकर याचे आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, तो पुण्यात खाजगी कंपनीत कामाला आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि मृगाच्या प्रारंभीच्या पावसावर शेतकरी अंबादास पवार यांनी उसनवारी करुन शेतात कापसाची लागवड केली.

सध्या पावसाने उघडीप दिल्याने कापसाच्या पिकांत तण वाढले आहे. त्यामुळे ते बैलजोडीच्या सहाय्याने काढण्यासाठी इतर शेतकऱ्यांकडे चौकशी केली. परंतु, दिवसाला अडीच हजार रुपयांचा दर सांगण्यात आला. एवढी रक्कम नसल्याने नाईलाजास्तव त्यांनी स्वत:च कोळपणीचा जू खांद्यावर घेतला. वयोवृध्द पतीचे श्रम पाहून पाणावलेल्या डोळ्यांनी पत्नी मुक्ताबाई पवार यांनी त्यांना शेतीकामास मदत केल्याचे पहावयास मिळाले. कोळपणी करताना ७५ वर्षीय अंबादास यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. परंतु, आर्थिक अडचणींमुळे त्यांना खांद्यावर जू घ्यावा लागला.

२० हजारांचे कर्ज काढलेपेरणीसाठी पैसे नसल्याने २० हजार रुपयांचे कर्ज काढून काळ्या आईची ओटी भरली. शेतात विहीर आहे, पण पाऊस नसल्याने पाणी नाही. शेतीसाठी यापूर्वीच सोसायटीचे ४० हजार रुपयांचे कर्ज काढले आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, डोक्यावरील कर्जाचा बोजा अजून कमी झाला नाही. शेतीमालाला भाव नाही, जगावे कसे? असा प्रश्न शेतकरी अंबादास पवार यांनी उपस्थित केला.

पतीचे श्रम पहावेनातशेतीवरच कुटुंबाची उपजीविका आहे. मात्र, निसर्गाने साथ न दिल्याने डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतच आहे. कापसातील तण काढण्यासाठी ७५ वर्षीय पतीने स्वत:च्या खांद्यावर जू घेतला. पतीचे हे श्रम पाहावत नाही. पण सांगायचे कुणाला?.- मुक्ताबाई अंबादास पवार, महिला शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र