उदगिरात शिक्षकाने शाळेतच केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 18:16 IST2018-04-19T18:16:02+5:302018-04-19T18:16:02+5:30
जळकोट रोडवरील एका प्राथमिक विद्यालयातील शिक्षकाने शाळेतच आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.

उदगिरात शिक्षकाने शाळेतच केली आत्महत्या
उदगीर : शहरातील जळकोट रोडवरील एका प्राथमिक विद्यालयातील शिक्षकाने शाळेतच आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही़
ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, केशव रूपचंद जाधव (४८, रा. म्हाडा कॉलनी ) हे जळकोट रोडवरील एका प्राथमिक विद्यालयात शिक्षक आहेत. नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत आले. दरम्यान, ८ वाजेच्या सुमारास त्यांनी वर्गातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.