औराद शहाजानी परिसरात वीज कोसळून दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST2021-05-10T04:19:29+5:302021-05-10T04:19:29+5:30

उदगीर शहरासह परिसरात रविवारी दुपारी ४५ मिनिटे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तालुक्यात काही ठिकाणी गाराही पडल्या. दरम्यान, तालुक्यातील ...

Two killed in lightning strike in Aurad Shahjani area | औराद शहाजानी परिसरात वीज कोसळून दोघे ठार

औराद शहाजानी परिसरात वीज कोसळून दोघे ठार

उदगीर शहरासह परिसरात रविवारी दुपारी ४५ मिनिटे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तालुक्यात काही ठिकाणी गाराही पडल्या. दरम्यान, तालुक्यातील शंभू उमरगा येथील शिवदास गंगथडे यांच्यावर वीज कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच जळकोट तालुक्यातील घोणसी येथील गंगाराम अदावळे व ओमकार सूर्यवंशी यांच्यावर वीज कोसळल्याने ते जखमी झाले. त्याचबरोबर १० पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत.

निलंगा तालुक्यातील काही गावांत रविवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. औराद शहाजानीतील येथील व्यापारी सुभाष किशन देशमुख-जैन (वय ३२) हे स्वतःच्या घरावरील काही साहित्य काढण्यासाठी गेले असता अचानक वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच तगरखेडा येथील गाेराेबा रामा सूर्यवंशी हे शेळ्या राखत शिवारात फिरत असताना पाऊस आल्याने झाडाखाली थांबले होते. तेव्हा वीज कोसळल्याने त्यांचाही मृत्यू झाला. औरादच्या हवामान केंद्रावर १९ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. कर्नाटक राज्यातील विंचूर येथील शेतकऱ्यांची काही जनावरे वीज कोसळून ठार झाली आहेत.

Web Title: Two killed in lightning strike in Aurad Shahjani area