घराला कुलूप लावून गेले; लातूरमध्ये चोरट्यांनी घरच साफ केले !

By राजकुमार जोंधळे | Updated: June 24, 2023 21:33 IST2023-06-24T21:32:38+5:302023-06-24T21:33:49+5:30

पाच लाखांची घरफाेडी : दागिन्यांसह राेकड लंपास

The house was locked; Thieves cleaned the house in Latur! | घराला कुलूप लावून गेले; लातूरमध्ये चोरट्यांनी घरच साफ केले !

घराला कुलूप लावून गेले; लातूरमध्ये चोरट्यांनी घरच साफ केले !

लातूर : घराला कुलूप लावून भावाकडे आई-वडील लातूर येथे गेले हाेते. दरम्यान, चाेरट्यांनी घराचे कुलूप ताेडून तब्बल पाच लाखांच्या दागिन्यांसह राेकड लंपास केल्याची घटना निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी येथे घडली. याबाबत औराद शहाजनी पाेलिस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविराेधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी शरद मधुकरराव काेळसुरे (वय ४० रा.माळेगाव कल्याणी, ता.निलंगा) यांच्या भावाच्या घरी त्यांचे आई-वडील घराला कुलूप लावून लातूर येथे गेले हाेते. दरम्यान, २१ ते २२ जूनच्या दरम्यान, अज्ञात चाेरट्यांनी बंद असलेल्या घराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. लाेखंडी पेटीचा कडी-काेयंडा ताेडून पेटीत ठेवलेली ५० हजारांची राेकड आणि ८२ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने (किंमत ४ लाख ५० हजार रुपये) असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल चाेरट्यांनी चाेरून नेला. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

 

Web Title: The house was locked; Thieves cleaned the house in Latur!