ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: May 19, 2025 20:36 IST2025-05-19T20:34:59+5:302025-05-19T20:36:41+5:30
रेल्वे उड्डाणपुलावर या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये प्रतिक्षा पस्तापुरे, सुमन धोत्रे आणि शिवाजी कतलाकुटे हे तिघे जागीच ठार झाले.

ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
- राजकुमार जोंधळे, लातूर
बार्शी महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर सोमवारी सांयकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ऑटो आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यात ऑटोतील तीन प्रवासी जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रतिक्षा संतोष पस्तापुरे (वय १० रा. बारानंबर पाटी, लातूर), सुमन सुरेश धोत्रे (वय ५८ रा. सावेववाडी, लातूर) आणि शिवाजी ज्ञानोबा कतलाकुटे (वय ५२ रा. बारानंबर पाटी, लातूर) अशी मयतांची नावे आहेत.
ऑटो-ट्रॅक्टरचा अपघात कसा झाला?
पोलिसांनी सांगितले, लातूर-बार्शी महामार्गावरुन बारानंबर पाटीकडे प्रवासी ऑटो (एमएच २४ ए.टी. ८४६९) निघाला होता. दरम्यान, बारानंबर पाटीकडून ट्रॅक्टर (एमएच २४ एजी २२४८) लातूर शहरात येत होता.
रेल्वे उड्डाणपुलावर या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये प्रतिक्षा पस्तापुरे, सुमन धोत्रे आणि शिवाजी कतलाकुटे हे तिघे जागीच ठार झाले. ऑटोतील इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
फरार ट्रॅक्टर चालकाला पकडले
या जखमी प्रवाशांची नावे रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाहीत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव जगताप यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली.
घटनास्थळावरुन ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. अपघातातनंतर पळून गेलेल्या ट्रॅक्टर चालकाला काही वेळात पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.