शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

लातूरजवळ भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:19 IST

लातूर - औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ झाला भीषण अपघात

लातूर:लातूर - औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ कार उलटून झालेल्या भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. हा अपघात आज दुपारी ४. १९ वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती आहे. देशमुख हे माजलगाव मतदारसंघात २०१४ ते २०१९ साली आमदार होते.

माजलगावचे माजी आ. आर. टी. देशमुख हे आपल्या कारने ( क्र. एमएच ४४ एडी २७९७) तुळजापूरमार्गे लातूरकडे येत होते. दुपारी ४:१९ वाजता बेलकुंडनजीक असलेल्या उड्डाणपुलावरून काही अंतरावर कार पुढे आल्यावर रस्त्यावर साचलेले पाणी कारच्या काचेवर पडले. त्यामुळे चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटला. बाजूस असलेल्या रस्त्याच्या कठड्याला कार जोरात धडकली. अपघातात कार चारवेळा पलटी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यात कारचालक व सोबत असलेले माजी आ. आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही रुग्णवाहिकेतून लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, रस्त्यातच माजी आ. आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला. चालकावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. 

जिजा म्हणून होते परिचितजिजा म्हणून सर्वत्र परिचित असलेले आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४ मध्ये माजलगावामध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा देशमुख यांनी जवळपास ३७ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गाडीने उड्डाणपुलाच्या दुभाजकाचे कठडे तोडलेचालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर चारचाकी रस्त्याच्या बाजूला उलटली. गाडीने दोन ते तीन पलट्या घेतल्याची माहिती आहे. गाडीतील चालक आणि माजी आमदार देशमुख दोघेही गंभीर जखमी झाले. जवळच असलेल्या पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ १०८ रुग्णवाहिकेस पाचारण केले. पोलिस आणि इतर वाहनधारकांनी गंभीर जखमी दोघांना गाडीतून बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातDeathमृत्यूBJPभाजपा