शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर तालुक्यात २०० शाळांतून विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST

उदगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा यावर्षी शासनाने टप्या-टप्याने सुरू करण्याचे आदेश दिल्याने जुलै महिन्यात इयत्ता ८ वी ...

उदगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा यावर्षी शासनाने टप्या-टप्याने सुरू करण्याचे आदेश दिल्याने जुलै महिन्यात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या, तर मागील आठवड्यात इयत्ता ५ वी ते ७ वीच्या शाळाही सुरू करण्यात आल्याने शहरी भाग वगळता तालुक्यातील २०० शाळा नियमित चालू झाल्या असून, विद्यार्थ्यांची उपस्थितीही दिलासादायक असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे यांनी दिली.

उदगीर तालुक्यात शहरी भाग वगळता ग्रामीण भागात खासगी व जिल्हा परिषदेच्या एकूण २२३ शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या १४५ तर खासगी ७८ शाळा आहेत. या सर्व शाळांतील एकूण पटसंख्या २५ हजार ४४६ आहे. सद्यस्थितीत २३ शाळा निवासी व आश्रम शाळा असल्यामुळे त्या चालू करण्यात आलेल्या नाहीत. तालुक्यातील हाळी व तोंडचिर येथे कोरोनाचा संसर्ग असल्याने तेथील शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. तर आजघडीला तालुक्यातील २०० शाळांतून ७५ टक्के पेक्षा जास्त विद्यार्थांची उपस्थिती असून, विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित असून, शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत. तालुक्यातील सुरू असलेल्या ग्रामीण भागातील शाळांतून आजपर्यंत एकही विद्यार्थी कोरोना संसर्गाने बाधित झाला नाही; मात्र खबरदारी घेणे आवश्यक आहे. तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची बैठक घेऊन १८ वर्षांपुढील विद्यार्थांना लसीकरण करून घेण्याची सूचना देण्यात आली आहे. तर तालुक्यातील जवळपास ९९ टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सांगितले.

धोका टळलेला नाही, काळजी घ्या...

कोरोना संसर्गाचा धोका टळलेला नाही. आजपर्यंत एक ही विद्यार्थी कोरोना संसर्गाने बाधित झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे. यापुढे जागरूक व सतर्क राहून अध्यापन करणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर व तापमान तपासणी नियमित करून घ्यावी. ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास तत्कळ प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात विद्यार्थांना पाठवून न घाबरता तपासणी करून घ्यावी. नितीन लोहकरे - गटशिक्षणाधिकारी

ऑफलाइनमुळे विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण...

जवळपास दीड वर्षापासून पाल्य घरीच बसून ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत होते. यावर्षी नियमित शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी आनंदात आहेत. नियमित शिक्षणाचे धडे घेत शाळेत खेळणे, बागडणे व धम्माल मस्ती यामुळे विद्यार्थी ताण-तणावातून मुक्त झाले आहेत. कोविडच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. - सुनील जाधव, पालक.