शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेस, टेस्ट आणि स्ट्रीट मोहीम प्रभावीपणे राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ...

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी शहर महानगरपालिका कार्यालयात जाऊन महानगरपालिका अधिकारी, पदाधिकारी यांची कोविड-१९ संदर्भात बैठक घेऊन महानगरपालिकेकडून शहरात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतला. यावेळी पालकमंत्री म्हणाले, महापालिका कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजेनेटेड आणि वेंटिलेटर बेडची संख्या वाढवावी, महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ४ हजार रुपयांपर्यंत खर्च करण्यात येत आहे, हे जाहीर करावे. गॅस दाहिन्या कार्यान्वित कराव्यात, भविष्यातील गरज लक्षात घेऊन शहरातील आरोग्य व्यवस्था सक्षम करावीत, दोन प्रभागांसाठी १ या प्रमाणात ३० बेडची रुग्णालये उभारावीत, या ३० पैकी ५ बेड वेंटिलेटर १५, बेड ऑक्सिजनेटेड तर १० बेड सर्वसाधारण असावेत, आदी सूचना करून महापालिकेच्या या मोहिमेत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

बैठकीदरम्यान महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहरातील स्मशानभूमीत सध्या असलेल्या व आवश्यकता असणाऱ्या गॅस दाहिनी, लसीकरण करण्यासाठी आवश्यक लस पुरवठा, ऐनवेळी गंभीर रुग्णास डीपीडीसी सेंटरमधून व्हेंटिलेटर उपलब्धतेबाबत माहिती दिली. आयुक्त अमन मित्तल यांनी लातूर शहरातील गौतमनगर, प्रकाशनगर भागातील वाढती रुग्णसंख्या, गांधी मार्केट भागात रॅपिड टेस्ट सुरू करणे, उपलब्‍ध खाजगी हॉस्पिटल, येत्या काळात शहरात असलेल्या सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची रॅपिड टेस्ट केली जाणार, शहरातील कोविड केअर सेंटरमधील सध्याची रुग्णसंख्या व दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा सुविधा, ऑक्सिजन बेड संख्या, उपलब्ध ऑक्सिजन साठा या बद्दलची माहिती दिली. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विरोधी पक्षनेते दीपक सुळ, उपायुक्त शशी नंदा, शैला डाके, मयुरा शिंदेकर, मंजूषा गुरमे, सह आयुक्त वसुधा फड, सह आयुक्त सुंदर बोंदर, डॉ. महेश पाटील, क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, संजय कुलकर्णी, समाधान सूर्यवंशी, डॉ. माले यांच्यासह विभागप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.