बसवर दगडफेक, अहमदपुरात गुन्हा दाखल; शिरूर ताजबंद बसस्थानकातील घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: September 3, 2023 19:50 IST2023-09-03T19:50:14+5:302023-09-03T19:50:59+5:30
याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बसवर दगडफेक, अहमदपुरात गुन्हा दाखल; शिरूर ताजबंद बसस्थानकातील घटना
अहमदपूर : शिरूर ताजबंद येथील बसस्थानकात उभ्या असलेल्या बसवर एकाने दगडफेक केली. यामध्ये बसची काच फुटली असून, ही घटना रविवार, ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आगाराचे चालक प्रसन्नकुमार माधव वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शिरूर ताजबंद येथील बसस्थानकात बस थांबविण्यात आली हाेती. दरम्यान, गणेश दत्ता शेळके (रा. कुमठा ता. अहमदपूर) याने बसवर दगड मारून काच फाेडली. यामध्ये बसचे नुकसान झाले आहे.
याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुरनं. ५२०/ २०२३ कलम ३३६, ४२७ भादंवी प्रमाणे, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा - ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्या गणेश शेळकेला पकडून पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी करत आहेत.