शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

तेल अन्‌ पेंढीचे भाव वधारल्याने सोयाबीन तेजीत; माल राखून ठेवलेले शेतकरी फायद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 15:39 IST

चांगला आणि नगदी दाम मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा हमीभाव केंद्राची वाट धरलीच नाही.

ठळक मुद्दे रबीच्या सुरुवातीला ४ हजार ३०० पर्यंत दर मिळाला होता. आता सौद्यात ५ हजार १०० रुपये दर मिळत आहे.

लातूर : तेल आणि डीओसीचे भाव वधारल्यामुळे सोयाबीन तेजीत असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी भाव मिळेल म्हणून सोयाबीन ठेवले होते, त्यांना याचा फायदा होत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये १४ हजार ४५६ क्विंटलची आवक असून, सर्वसाधारण दर ५ हजार २० रुपये, किमान ४ हजार ६५०, तर कमाल ५ हजार ११३ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हमी भावापेक्षा किती तरी चांगला दर मार्केट यार्डात मिळत आहे. त्यामुळे यंदा हमीभाव केंद्र ओस पडली आहेत. 

सर्वच शेतकरी मार्केट यार्डात सोयाबीनची विक्री करीत आहेत. दर चांगला आणि नगदी दाम मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा हमीभाव केंद्राची वाट धरलीच नाही. गेल्या आठ - दहा दिवसांपासून सोयाबीनला हा दर मिळत आहे. रब्बी पेरणीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात आवक होती. त्यावेळी ४ हजार ३०० पर्यंत दर मिळाला होता. आता सौद्यात ५ हजार १०० रुपये दर मिळत आहे. पोटलीमध्ये ४ हजार ९६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

बाजारात तेलाचे भाव वधारले आहेत. काही दिवसांपूर्वी सोयाबीनचा दर ११ हजार रुपये क्विंटल होता. सध्या ११ हजार २१० क्विंटलपर्यंत हे दर गेले आहेत. त्यामुळे मार्केट यार्डात सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याचे व्यापारी पांडुरंग मुंदडा यांनी सांगितले. पेंढीचाही दर चांगला झाला आहे. त्याचाही फायदा सोयाबीनचा दर वाढण्यात होत आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे, त्यांना सध्या चांगला फायदा होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार