शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे सोयाबीन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात चार दिवसांपासून सतत हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे काढणीस ...

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात चार दिवसांपासून सतत हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे काढणीस आलेले सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. तसेच बाजारपेठेत दरही घसरल्याने चिंता वाढली आहे.

औराद शहाजानी कृषी मंडळात यंदा जवळपास ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर साेयाबीनचा पेरा झाला आहे. दोन टप्प्यांत पेरणी झाली. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने पिकांची शाकीय वाढ व्यवस्थित झाली नाही. त्यानंतर पाऊस सुरू होऊन अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत असताना चार दिवसांपासून सतत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. गुरुवारी दिवसभर झडीचा पाऊस होता. या पावसामुळे उभ्या सोयाबीनला शेंगा फुटत आहेत. त्यामुळे हाता- तोंडाशी आलेले पीक निसर्गामुळे हिरावले जात आहे.

दरम्यान, बाजारपेठेत ११ हजारांपर्यंत पोहोचलेले सोयाबीनचे दर चार दिवसांत एकदम कोसळले आहेत. ४ हजार ६०० ते ६ हजारांच्या दरम्यान दर आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसाने उघडीप दिल्यास सोयाबीनचे होणारे नुकसान टळणार आहे.

दरम्यान, औराद परिसरातील मांजरा व तेरणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांवरील सर्व उच्चस्तरीय बंधारे, परिसरातील लहान-मोठे लघू तलाव पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी ओढा, नाल्याने नदी पात्रात वाहत येत आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेरणा नदीवरील औरादसह इतर बंधाऱ्यांची दारे उघडण्यात आली आहेत. दाेन्ही नद्यांचे पाणी संगमावर पसरले आहे. गुरुवारी रात्री पुन्हा जाेरदार पाऊस झाला असून, येथील हवामान केंद्रावर ६० मिमी पावसाची नाेंद झाली आहे.

सप्टेंबरमध्येच वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. महिना अखेरीस कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेऊन पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. एकीकडे साेयाबीन दर घसरले आहेत तर दुसरीकडे हाता-तोंडाशी आलेले पीक पाऊस काढू देत नाही.

उतारा ५० टक्क्यांनी घटला...

मी बागायतदार शेतकरी हाेताे. सततच्या कमी-जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बागायती क्षेत्र मोडून आठ बॅग साेयाबीनची पेरणी केली. ऐन फळधारणेच्या कालावधीत पावसाने उघडीप दिली. आता काढणीवेळी सतत पाऊस होत आहे. त्यामुळे यंदा उतारा ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत राहणार आहे. पावसाने उघडीप दिली तर त्याची तूट भावात भरून निघेल, अशी अपेक्षा हाेती. परंतु, दर घसरल्याने संकट निर्माण झाले आहे. तसेच दाेन एकरवर टोमॅटो होते. परंतु, बाजारात भाव मिळाला नाही. त्याचा उताराही ४० टक्क्यांनी घटला आहे.

- ओमकार मरगणे, शेतकरी.