काँग्रेसला मोठा धक्का! माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील भाजपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:45 IST2024-03-29T17:42:11+5:302024-03-29T17:45:01+5:30

बदलत्या राजकीय परिस्थितीत अनेकांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सामाजिक माध्यमांमधून होत होती. त्यात डॉ. अर्चना पाटील यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.

son in law of Congress leader Chakurkar Dr Archana Patil in BJP | काँग्रेसला मोठा धक्का! माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील भाजपमध्ये

काँग्रेसला मोठा धक्का! माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील भाजपमध्ये

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर शनिवारी मुंबईत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान, डॉ. अर्चना यांनी अधिकृत पक्ष प्रवेशापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर भाजप प्रवेशाचा मुहूर्तही ठरला आहे. त्यांनी भाजपात यावे यासाठी स्थानिक पातळीवर एक गट सातत्याने भेटी घेत होता. 

बदलत्या राजकीय परिस्थितीत अनेकांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सामाजिक माध्यमांमधून होत होती. त्यात डॉ. अर्चना पाटील यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील या राजकीय घडामोडी प्रचारात रंग भरणार आहेत. तसेच विधानसभेचे चित्रही राजकीय अभ्यासक आतापासूनच रंगवणार आहेत.

Web Title: son in law of Congress leader Chakurkar Dr Archana Patil in BJP