शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

'साहेब, मला वाचवा!'; खदानीतून तरुणीची आर्त हाक, होमगार्डने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:09 IST

होमगार्डचे धाडस आले कामी; पोलिसांना मदतीसाठी हाक देणाऱ्या तरुणीचा वाचला जीव

- महेबूब बक्षीऔसा (लातूर): नैराश्यातून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने औसा-लातूर महामार्गालगतच्या कारंजे खडी केंद्रातील खदानीत उडी घेतलेल्या एका २१ वर्षीय तरुणीचा जीव औसा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि एका होमगार्डच्या अतुलनीय धाडसामुळे वाचला आहे. मृत्यूच्या दाढेतून "साहेब, मला वाचवा!" अशी हाक देणाऱ्या या तरुणीला वाचवण्यासाठी होमगार्डने कसलाही विचार न करता खोल पाण्यात उडी घेतली.

मूळची खरोसा येथील ही तरुणी वडिलांच्या निधनानंतर नैराश्यात होती. जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन तिने बुधवारी रात्री ११:२० वाजण्याच्या सुमारास कारंजे खडी केंद्रातील खदानीत निवड केली. खदानीत उडी घेतल्यानंतर ती कडेच्या झाडाला अडकली. याचवेळी मरण्याचा विचार बदलताच तिने तातडीने आपल्या मोबाईलवरून ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना ‘मी आत्महत्या करत आहे, मला वाचवा’ अशी आर्त हाक दिली.

लातूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ हे लोकेशन औसा पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस निरीक्षक रेवन डमाले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अतुल डाके, सचिन मंदाडे यांच्यासह होमगार्ड उद्धव दळवे आणि इतर जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

होमगार्डचे अतुलनीय धाडस, 'वर्दी'चा सन्मानअंधारात आवाजाच्या दिशेने धाव घेत, होमगार्ड उद्धव दळवे यांनी वर्दीसह कसलाही विचार न करता रात्री ११:३० वाजता खोल खाणीत उडी घेतली. होमगार्ड दळवे यांनी सुमारे १५ मिनिटे खोल पाण्यात बुडत असणाऱ्या त्या तरुणीच्या केसांना धरून तिला काठाजवळ आणले आणि इतरांच्या मदतीने ओढणीच्या सहाय्याने सुखरूप वर काढले. दळवे यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एकाचा जीव वाचल्याचे समाधानहोमगार्ड उद्धव दळवे म्हणाले, "मेलो तरी चालेल, पण त्या मुलीला वाचवायचे या भावनेने मी खदानीत उडी घेतली. एकाचा जीव वाचल्याने माझे जीवन सार्थक झाले." सध्या तरुणीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून, औसा पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आणि धाडसामुळे एका कुटुंबाचा आधार वाचला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Home Guard Rescues Suicidal Woman from Quarry in Ausa

Web Summary : A 21-year-old woman attempting suicide in a quarry was saved by a Home Guard in Ausa. Hearing her cries for help, the guard bravely jumped into the water and rescued her, preventing a tragic loss. Police acted swiftly.
टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी