शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी रुग्णालय परिसरात शासनमान्य दर दर्शवणारे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST

लातूर शहरात ५५ पेक्षा अधिक खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आजपर्यंत हजारो रुग्ण हे उपचार ...

लातूर शहरात ५५ पेक्षा अधिक खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आजपर्यंत हजारो रुग्ण हे उपचार घेऊन बरे झाले आहेत. खाजगी रुग्णालयात उपचार घेताना अनेकवेळा संबंधित डॉक्टर योग्य पद्धतीने बिल घेत आहे की नाही? अशी शंका असते. त्यामुळे रुग्णालयात अधिक पैसे घेतले जात असल्याची नातेवाईकांची तक्रार असते. अशावेळी डॉक्टरांनी आपल्याला दिलेले बिल तपासून पाहता यावे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्व खासगी रुग्णालयांच्या परिसरात शासनमान्य दर दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत.

शासकीय दरानुसार एखादा रुग्ण जनरल वॉर्डमध्ये विलगीकरणात असेल तर त्यासाठी ४ हजार रुपये दर आहे. व्हेंटिलेटर शिवाय रुग्ण अतिदक्षता विभागात विलगीकरणात असेल तर त्यासाठी ७ हजार ५०० रुपये तर व्हेंटिलेटरसह उपचार सुरू असतील तर त्यासाठी ९ हजार रुपये शासकीय दर निश्चित करण्यात आलेला आहे. एक दिवसाच्या आकारण्यात आलेल्या दरामध्ये रुग्णाची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणी, २ डी इको, एक्स-रे, ईसीजी व ऑक्सिजन चार्ज, मर्यादित किरकोळ औषधे, डॉक्टर तपासणी, बेड चार्जेस, जेवण, नाकातून नळी टाकण्यासारखे छोटे उपचार यांचा समावेश आहे. याशिवाय पीपीई किट, सेंट्रल लाईन टाकणे, केमोपोर्ट टाकणे, श्वसन नलिका व अन्य नलिकात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, कुठल्याही अवयवाचा तुकडा तपासणीसाठी पाठवणे, छातीतील व पोटातील पाणी काढणे, सिटीस्कॅन सारख्या तपासण्या यासाठी स्वतंत्र दर आकारण्यात येतो. एक दिवसाच्या शुल्कामध्ये या तपासण्यांच्या शुल्काचा समावेश असत नाही. त्यासाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतात. खाजगी रुग्णालयात शासकीय दरापेक्षा अधिक पैसे आकारले जात असतील तर रुग्ण किंवा नातेवाईकांनी मनपाच्या हेल्पलाइनवर तक्रार करावी,असे आवाहनही मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.