शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थापुढे नातेसंबंध तुटले; शेतीच्या वादातून सख्ख्या भावासह जावयाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 19:39 IST

Murder in farming dispute : सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास दोन भावांमध्ये शेतीच्या वादातून भांडण झाले.

ठळक मुद्देगनमत करून कुऱ्हाड, कत्ती तलवार, लोखंडी रॉडने केली मारहाण

उदगीर (जि. लातूर) : उदगीर तालुक्यातील हेर येथे शेतीच्या वादातून भाऊ व त्याच्या जावयाचा खून करण्यात आल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव म्हणाले, हेर येथे सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास दोन भावांमध्ये शेतीच्या वादातून भांडण झाले. यावेळी बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप व पूजा जगताप, आश्विनी जगताप, फुलाबाई जगताप, सोजरबाई ढगे यांनी संगनमत करून कुऱ्हाड, कत्ती तलवार, लोखंडी रॉडने गोविंद जगताप यांना जबर मारहाण केली. त्यांना दुचाकीवरून घेऊन जाणारे मयताचे जावई नितीन फावडे व भगवान जगताप यांनाही मारहाण करण्यात आली. 

यात नितीन फावडे हे गंभीर जखमी झाले. गोविंद जगताप यांना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेले मयताचे जावई नितीन फावडे यांना उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले होते, मांत्र त्यांचाही मृत्यू झाला आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक उदगिरात... शेतीच्या वादातून खून झाल्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात घटनेची माहिती घेतली जात असून रात्री गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक ठाण्यात बसून आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर