निर्जन स्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:25+5:302021-09-19T04:21:25+5:30

लातूर शहरातील शाळा, महाविद्यालये सध्याला बंद आहेत. तर सणासुदीचे दिवस आहेत. अशावेळी बाजारपेठेत महिलांसह मुलींचीही वर्दळ असते. अशावेळी निर्जन ...

A secluded place has become a den of criminals! | निर्जन स्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे!

निर्जन स्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे!

लातूर शहरातील शाळा, महाविद्यालये सध्याला बंद आहेत. तर सणासुदीचे दिवस आहेत. अशावेळी बाजारपेठेत महिलांसह मुलींचीही वर्दळ असते. अशावेळी निर्जन स्थळापासून महिला, मुलींना ये-जा करणे कठीण आहे. तर काही ठिकाणी मुलींच्या छेडछाडीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. जुने रेल्वे स्थानक परिसर, रेणापूर नाका परिसर, रेल्वस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर, मळवटी राेड, नवीन नांदेड नाका परिसर, लातूर शहराबाहेरील बार्शी राेड परिसर, कळंब राेड परिसर, राजीव गांधी चाैक ते गरुड चाैक परिसरात निर्जन स्थळी गुन्हेगारांचा वावर वाढला आहे.

ही ठिकाणे धाेक्याचीच...

रेणापूर राेड...

लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका ते महापूर या मार्गावर सायंकाळच्या सुमारास धावत्या वाहनांशिवाय काेणीच नसते. पहाटे आणि सायंकाळच्या वेळी काही नागरिक, महिला फेरफटका मारताना दिसून येतात. एकट्या आणि जाेडीदारांना गाठून काही गुन्हेगारांकडून लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी डाॅक्टरला लुटल्याची घटना घडली.

मळवटी राेड परिसर...

लातुरातील साठ फुटी राेड ते सिद्धेश्वर मंदिर आणि पुढे मळवटी राेड, रिंगराेड परिसरात सायंकाळनंतर फारशी वर्दळ नसते. अशावेळी फिरायला जाणाऱ्यांना टवाळखाेरांकडून धाेका आहे. तर काही गुन्हेगार माेटारसायकलवरून येत शस्त्राचा धाक दाखवत लुटण्याची भीती आहे.

पाेलिसांची गस्त वाढविण्याचे आदेश...

लातूर शहरातील निर्जन आणि ओसाड परिसरात गुन्हेगारांचा वावर असताे. यासाठी त्या-त्या ठाण्यांच्या प्रमुखांना त्या भागात गस्त वाढविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही अशा ठिकाणी फिरू नये. काही संशय आणि अडचणी आल्या तर संबंधित पाेलीस ठाण्यांशी संपर्क साधून मदत घ्यावी. अशा गुन्हेगारांवर दामिनी पथक, त्या-त्या ठाण्यांच्या पथकांची नजर आहे. - निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

Web Title: A secluded place has become a den of criminals!