पं. स. सदस्यावरील कारवाईच्या निषेधार्थ माजी राज्यमंत्री पाटील यांचा ठाण्यात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:22 AM2021-01-16T04:22:54+5:302021-01-16T04:22:54+5:30

अहमदपूर तालुक्यातील शेणकुड येथील पंचायत समिती सदस्य राम नारवाटे यांचे ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल असून, त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे असल्याने पोलिसांनी ...

Pt. C. Former Minister of State Patil stays in Thane to protest against the action taken against the member | पं. स. सदस्यावरील कारवाईच्या निषेधार्थ माजी राज्यमंत्री पाटील यांचा ठाण्यात ठिय्या

पं. स. सदस्यावरील कारवाईच्या निषेधार्थ माजी राज्यमंत्री पाटील यांचा ठाण्यात ठिय्या

googlenewsNext

अहमदपूर तालुक्यातील शेणकुड येथील पंचायत समिती सदस्य राम नारवाटे यांचे ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल असून, त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे असल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईबाबत नोटीस बजावली. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सदरची कारवाई मतदानादिवशी का केली, आचारसंहितेपूर्वी का केली नाही, असा सवाल माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी उपस्थित केला. मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना शेवटच्या टप्प्यात अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अहमदपूर पोलीस ठाणे गाठून ठिय्या आंदोलन केले.

यावेळी माजी जि.प. सदस्य देवानंद मुळे, सय्यद साजिदभाई, राम बेल्लाळे, नगरसेवक राहुल शिवपूजे, लक्ष्मीकांत कासनाळे, यतिराज केंद्रे, अमित रेड्डी, गोविंद गिरी, मुजम्मील सय्यद, निखील कासनाळे, किशोर पोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Pt. C. Former Minister of State Patil stays in Thane to protest against the action taken against the member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.