टेम्पोच्या धडकेने पोलीस कर्मचारी ठार, टेम्पोचालकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 21:27 IST2019-02-13T21:27:31+5:302019-02-13T21:27:52+5:30
घरणीनजीकची घटना

टेम्पोच्या धडकेने पोलीस कर्मचारी ठार, टेम्पोचालकास अटक
चाकूर (जि़ लातूर) : तालुक्यातील घरणी येथील महामार्ग पोलीस ठाण्यासमोर पोलीस पथक वाहनांची तपासणी करीत होते़ तेव्हा भरधाव वेगातील टेम्पोचालकाने एका पोलीस नाईकास जोराची धडक दिली़ त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी लातुरात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला़ ही घटना बुधवारी सकाळी ८ वा़ च्या सुमारास घडली़
नागेश सूर्यकांत चौधरी (३४, रा़ देवंग्रा, ता़ औसा) असे मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे़. घरणी येथील महामार्ग पोलीस ठाण्यासमोर बुधवारी सकाळी पोलीस पथक वाहनांची तपासणी करीत होते़. तेव्हा वडवळ (नागनाथ) येथून टोमॅटो भरून मुंबईकडे जाणाºया टेंम्पो (एमएच ०३, सीपी- ३४५०) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून पोलीस नाईक नागेश सूर्यकांत चौधरी (रा़ देवंग्रा) यांना धडक दिली़ त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. दरम्यान, ही घटना घडताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जी़व्ही़ गादेकर, पोकॉ़ आऱबी़ ठाकूर, नितीन चव्हाण, संजय दुधभाते, तुकाराम सगर, योगीराज नागरगोजे आदींनी चौधरी यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी महामार्ग पोलिसांनी टेंम्पोचालक अब्दुलबारी अब्दुल रफ (रा़ सहजपूर, उत्तरप्रदेश) यास ताब्यात घेतले आहे.