शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शंभर दिवसांत लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST

रेमडेसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळावा, तसेच दुसऱ्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना देत पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, ग्रामीण ...

रेमडेसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळावा, तसेच दुसऱ्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना देत पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी. जिल्ह्यात शंभर दिवसांमध्ये लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचे नियोजन सादर करावे. २५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावांमध्ये विलगीकरण उभारावे. शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडिट करावे. सर्व रुग्णालयांतील अग्निशमन यंत्रणा तपासून घ्यावी, ऑक्सिजन, औषधी व लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. उदगीर येथील रुग्णालयासाठी ऑक़्सिजनची वाढत असलेली मागणी आणि वाहतुकीदरम्यान येत असलेल्या अडचणी लक्षात घेता विलास सहकारी साखर कारखाना युनिट क्र. २ येथे तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारणे शक्य आहे का, याची शक्यता तपासून पाहावी, अशी सूचना त्यांनी दिली.

लसीकरण केंद्राची पाहणी

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान संस्था, लातूर येथे करण्यात आला. जिल्ह्यातील एकही लाभार्थी कोविड-१९ च्या लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. लातूर, उदगीर, निलंगा, ग्रामीण रुग्णालय औसा, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर या पाच ठिकाणी या वयोगटात लसीकरण सुरू झाले आहे, त्याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.