शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दर नसल्याने पपई उत्पादक संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

येरोळ : आधुनिकतेची कास धरत शेतकरी आपल्या शेतात विविध नाविण्यपूर्ण प्रयोग राबवितात. मात्र, शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतक-यांना ...

येरोळ : आधुनिकतेची कास धरत शेतकरी आपल्या शेतात विविध नाविण्यपूर्ण प्रयोग राबवितात. मात्र, शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतक-यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. येथील युवा शेतकरी पाशा गफुरसाब कोतवाल यांनी उत्पनाच्या आशेवर पपईची लागवड केली. परंतु व्यापारी तीन ते चार रुपये किलो दराने पपई मागत असल्याने तोडणीव मजुरीचा खर्च निघत नाही. परिणामी, पपई झाडावरच खराब होत आहे. परिणामी, पपई उत्पादक संकटात सापडले आहे.

येरोळ येथील शेतकरी पाशा गफुरसाब कोतवाल यांनी दोन एकर शेतीमध्ये ऑक्टाेबर महिन्यात पपईचे दिड हजार झाड लावले होते. यासाठी त्यांना शेणखत, लिक्विड खत, मिक्स डोस, मल्चिंग पेपर, फवारणी, जमीनीची मशागत, मजुरी असा १ लाख ६० हजार रुपयाचा खर्च आला होता. यामध्ये खर्च जाता अडीच ते तीन लाख रुपयाचे उत्पन्न होईल, असा त्यांनी अंदाज बांधला होता. परंतु अचानक पपईचे मार्केट पडले. पपईचा भाव तीन ते चार रुपये प्रति किलो झाला. आता मिळेल त्या भावात पपई विकून पैसे मोकळे व्हावे, म्हणुन पाशा कोतवाल यांनी अनेक व्यापा-यांना संपर्क साधला पण कुणीही शेतात येऊन माल घ्यायला तयार नाही. लातुर, उदगीर येथील मार्केटला जाऊन तीन-चार रुपये किलो प्रमाणे पपई विकल्यास वाहतूक खर्चातच जास्त पैसे जाणार असल्याने पपई उत्पादक शेतकरी कोतवाल हतबल झाले आहेत.

खर्चही निघणे झाले अवघड...

गेल्या दाेन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यातच शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. या सर्व संकटावर मात करीत शेतकरी विविध नाविण्यपूर्ण प्रयोग करीत असले तरी भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. पिकांवर केलेला खर्चही निघेने अवघड झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. दरम्यान, शासनाने नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत करण्याची मागणी होत आहे.