शहरातील रुग्णसंख्येत होतेय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:37+5:302021-05-10T04:19:37+5:30

८ मे रोजी नागरी दवाखानानिहाय आढळलेले रुग्ण ८ मे रोजी एकूण १९० रुग्ण आढळले आहेत. इंडिया नगर नागरी दवाखान्याअंतर्गत ...

The number of patients in the city is declining | शहरातील रुग्णसंख्येत होतेय घट

शहरातील रुग्णसंख्येत होतेय घट

Next

८ मे रोजी नागरी दवाखानानिहाय आढळलेले रुग्ण

८ मे रोजी एकूण १९० रुग्ण आढळले आहेत. इंडिया नगर नागरी दवाखान्याअंतर्गत ३१, गौतमनगरअंतर्गत ५२, प्रकाशनगर नागरी दवाखान्याअंतर्गत ३८, मंठाळे नगरअंतर्गत २२, राजीव नगरअंतर्गत ५, बौद्ध नगर नागरी दवाखान्याअंतर्गत १७, तावरजा कॉलनीअंतर्गत १५ आणि अन्सार नगर नागरी दवाखान्याअंतर्गत १० असे १९० रुग्ण आढळले आहेत. १ मे रोजी शहरातील एकूण रुग्णांचा आकडा २३८ वर होता. त्यानंतर थोडी थोडी घट होत गेली आहे.

खबरदारी आणि काळजीची गरज

शहरातील नागरी दवाखान्याअंतर्गत रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र असले तरी काळजी घेण्याची गरज आहे. नियमित मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. विनाकारण गर्दीत जाऊ नये. सध्या शहरातील रुग्णसंख्या घटली असली तरी दवाखाने मात्र हाऊसफुल्ल आहेत. ग्रामीण व इतर भागांतून रुग्ण दाखल झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार म्हणाले.

Web Title: The number of patients in the city is declining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.