शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

गुणपत्रक-प्रमाणपत्र आता एकाच कागदावर! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 20:12 IST

विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमातही होणार बदल; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता मिळणार एकत्रित गुणपत्रक, प्रमाणपत्र

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी/मार्च २०२६ च्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र वेगवेगळे न मिळता, ते एकत्रित स्वरूपात देण्यात येणार आहे. लातूर विभागीय मंडळाचे सचिव यांनी यासंदर्भात लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना लेखी पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.

आतापर्यंत गुणपत्रकावर नावाचा क्रम वेगळा असू शकत होता. मात्र, नवीन निर्णयानुसार एकत्रित गुणपत्रकावर विद्यार्थ्यांचे नाव ‘प्रथम नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव’ अशा विशिष्ट क्रमानेच छापले जाणार आहे. या नावाच्या क्रमात काही त्रुटी असल्यास त्या ऑनलाइन पद्धतीने तत्काळ दुरुस्त करून घेण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत.

फोटो दुरुस्तीसाठी शेवटची संधीज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर फोटो अस्पष्ट होते आणि त्यावर मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने नवीन फोटो लावण्यात आले होते, अशा विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा अपलोड करणे अनिवार्य आहे. यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर फोटो करेक्शन ही लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे.

मुख्याध्यापकांना कडक सूचना..!मंडळाने स्पष्ट केले आहे की, फोटो किंवा नावातील दुरुस्तीची ही शेवटची संधी आहे. यानंतर कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. जर एखाद्या विद्यार्थ्याची माहिती चुकीची छापली गेली किंवा फोटोमध्ये त्रुटी राहिली, तर होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जातील.

महत्त्वाचे मुद्दे :एकत्रित दस्तऐवज : गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आता एकाच कागदावर मिळणार.नावाचा नवा फॉरमॅट : नाव, वडिलांचे नाव, आडनाव असा असेल क्रम.अंतिम मुदत : फोटो दुरुस्तीसाठी पोर्टलवरील लिंकचा वापर तातडीने करणे आवश्यक.

कागदपत्रांची संख्या कमी होणार..!या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची संख्या कमी होऊन ती जतन करणे सोपे होणार आहे. लातूर विभागातील तिन्ही जिल्ह्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावरून सर्व शाळा-महाविद्यालयांना या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Marksheet and certificate combined! Board's historic decision for students.

Web Summary : Maharashtra board will issue combined mark sheets and certificates from 2026 for 10th and 12th. Name format is standardized. Photo corrections must be done promptly; schools are responsible for errors.
टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालSSC Resultदहावीचा निकालlaturलातूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र